तुर्कीच्या दहशतवादाविरोधात इस्रायलने आर्मेनियाला साथ द्यायला हवी

- युरोपियन विश्लेषकाचे आवाहन

दहशतवादाविरोधातजेरुसलेम/येरेवान – ‘ज्यूवंशीय व आर्मेनियन्स हे त्यांच्या शेजाऱ्यांपेक्षा अत्यंत वेगळे आहेत. त्यांना मोठा व दीर्घ इतिहास आहे. अनेक आक्रमणे व युद्धांना तोंड देऊन ठामपणे उभे राहिले आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्या डोळ्यांसमोर पाश्चात्य जगाचा ऱ्हास होताना दिसतो आहे. अशा स्थितीत तुर्की सारख्या धोकादायक शत्रूकडून सुरू असलेल्या दहशतवादाविरोधात इस्रायलने आर्मेनियाला साथ देणे आवश्यक आहे. हा नैतिक तसेच धोरणात्मकदृष्ट्या योग्य निर्णय ठरेल’, असे आवाहन युरोपियन विश्लेषक गिलिओ मेओती यांनी केले आहे. ‘इस्रायल नॅशनल न्यूज’ या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात मेओती यांनी हे आवाहन करताना तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन हे ख्रिस्तीधर्मीयांसह युरोप, पाश्चात्य संस्कृती व आपल्या समान मूल्यांसाठी गंभीर धोका असल्याचा इशाराही दिला.

‘सिरिया, लिबिया व भूमध्य समुद्रानंतर तुर्कीच्या सुल्तानाने (एर्दोगन) त्याची नजर नागोर्नो-कॅराबखकडे वळवली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा भूभाग आर्मेनियाचा आहे आणि त्यावर इस्लामिक देश अझरबैजानने दावा सांगितला आहे. एर्दोगन यांनी विश्वासघातकी कतारच्या पाठिंब्यावर आपली मारेकऱ्यांची फौज अझरबैजानमध्ये पाठवली आहे. एका वेबसाईटच्या दाव्यानुसार, तुर्कीने चार हजार भाडोत्री मारेकरी अझरबैजानमध्ये पाठविले आहेत आणि अजून जायच्या तयारीत आहेत. आम्ही ख्रिस्तीधर्मीय आक्रमकांविरोधात लढायला जात असून हा जिहादचा भाग असल्याचे दावे त्यांच्याकडून करण्यात येत आहेत’, अशा शब्दात मेओती यांनी आर्मेनिया-अझरबैजान युद्ध हा केवळ एका प्रांतासाठी चाललेला संघर्ष नसल्याची जाणीव करून दिली.

दहशतवादाविरोधात

पूर्वेतील ख्रिस्तीधर्मीयांसाठी यापूर्वीही रशिया व रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन उभे राहिले होते आणि आताही आर्मेनियन्सना त्यांचाच आधार आहे, असा दावा युरोपियन विश्लेषकांनी केला. ‘आता इस्रायलनेही त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज असून अझरबैजानला शस्त्रे विकणे थांबवायला हवे. तुर्की हा इस्रायलचा शत्रूच आहे, हे लक्षात ठेवायला हवे’, असे गिलिओ मेओती यांनी म्हटले आहे. ग्रीसपासून आर्मेनियापर्यन्त एर्दोगन यांच्याविरोधात संघर्ष करताना केवळ हितसंबंध नाही तर संस्कृतीचे अस्तित्त्वही पणाला लागले आहे हे युरोपने समजून घ्यायला हवे, या शब्दात त्यांनी युरोपलाही इशारा दिलादहशतवादाविरोधात

काही दिवसांपूर्वी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान यांनी, तुर्कीला आर्मेनियन्सचा वंशसंहार घडवायचा आहे, असा खळबळजनक आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी तुर्कीच्या ग्रीस व आर्मेनियाविरोधातील कारवायांचा उल्लेख करून, पुढील काळात तुर्की युरोपमधील व्हिएन्ना शहरापर्यंत येऊन धडकला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असेही बजावले होते.

leave a reply