अमेरिकेची सिरियातील सैन्यतैनाती बेकायदेशीर

- इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

तेहरान – ‘सिरियामधील घुसखोर अमेरिकेची सैन्यतैनाती आणि येथील दहशतवादविरोधी कारवाईत सहभागी झ्ाालेल्या गटांवर अमेरिकेचे हवाईहल्ले, पूर्णपणे बेकायदेशीर आणि स्वतंत्र सिरियाच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन करणारे आहेत’, असा आरोप इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. काही दिवसांपूर्वीच सिरियातील आपले हवाई हल्ले अमेरिकेची सुरक्षा व हितासाठी असल्याचे पेंटॅगॉनने जाहीर केले होते. त्यावर इराणकडून ही तीव्र प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे.

सैन्यतैनातीगेल्या आठवड्यात सिरियातील अमेरिकेच्या देर अल-झ्ाोर प्रांतातील लष्करी तळावर ड्रोन्सचे हल्ले झ्ााले होते. अमेरिकेने यासाठी इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले होते. तसेच प्रत्युत्तरादाखल सिरियातील इराण व इराणसंलग्न संघटनांच्या तळांवर केलेली कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने केलेल्या या घोषणेवर इराणने आक्षेप घेतला.

अमेरिकेने सिरियात अवैधरित्या घुसखोरी करून येथे लष्करी तळ उभारला आहे. त्यामुळे सिरियातील अमेरिकेची कारवाई बेकायदेशीर, नियमबाह्य आणि स्वतंत्र सिरियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणाी ठरते, अशी टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कानी यांनी केली. त्यामुळे अमेरिकेला सिरियातील इराणच्या कारवायांवर आक्षेप घेण्याचा अधिकार नसल्याचे कानी सुचवित असल्याचे दिसते. दरम्यान, सिरियामध्ये इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटना प्रबळ होत असल्याचा आरोप इस्रायलने याआधी केला होता.

leave a reply