अमेरिका-फिलिपाईन्सच्या नौदलाचा सर्वात मोठा ‘लाईव्ह फायर’ युद्धसराव

मनिला/बीजिंग – अमेरिका व फिलिपाईन्सचे सुमारे १८ हजार जवान आणि युद्धनौकांचा समावेश असलेला सर्वात मोठा लाईव्ह फायर युद्धसराव मंगळवारपासून सुरू झाला. काही तासांपूर्वीच अमेरिकेच्या विनाशिकेने ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या कृत्रिम बेटाजवळून गस्त घातली होती. अमेरिकेचा हा युद्धसराव म्हणजे आपल्या सागरी हद्दीतील घुसखोरी असल्याचा आरोप चीनने केला होता.

अमेरिका-फिलिपाईन्सच्या नौदलाचा सर्वात मोठा ‘लाईव्ह फायर’ युद्धसरावअमेरिका व फिलिपाईन्समध्ये मंगळवारपासून सुरू झालेल्या ‘बालिकतान-तगालोग’ युद्धसराव २८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यात अमेरिकेची पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा, हिमर्स रॉकेट लाँचर्स आणि रणगाडाभेदी जॅव्हलिन क्षेपणास्त्रांचा देखील वापर होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांची लढाऊ विमाने आणि विनाशिका हवाई हल्ल्याचादेखील सराव करतील. अमेरिका-फिलिपाईन्सच्या नौदलाचा सर्वात मोठा ‘लाईव्ह फायर’ युद्धसरावअमेरिका-फिलिपाईन्सच्या जवानांबरोबर ऑस्ट्रेलियाचे १११ जवान देखील यात सहभागी होणार असल्याचा दावा केला जातो.

‘हा युद्धसराव म्हणजे कोणत्याही देशाला दिलेली चिथावणी नाही. तर शत्रूने अमेरिका व मित्रदेशांच्या हद्दीत घुसखोरी करु नये यासाठीचा अभ्यास आहे’, असे अमेरिकी लष्कराचे प्रवक्ते कर्नल मायकल लॉजिको यांनी स्पष्ट केले. या लाईव्ह फायर युद्धसरावादरम्यान विनाशिकेला जलसमाधी देण्याचा अभ्यास केला जाईल. महिनाअखेरीपर्यंत चालणारा हा युद्धसराव ‘साऊथ चायना सी’वर अधिकार सांगणाऱ्या चीनसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो.

हिंदी

 

leave a reply