अमेरिकेने तैवानबाबतची ‘रेड लाईन’ ओलांडू नये

अस्वस्थ चीनची अमेरिकेला धमकी

बीजिंग – ‘तैवान हा चीनच्या हितसंबंधांचा मुख्य गाभा असून हाच अमेरिका-चीनमधील राजकीय संबंधांचा पाया देखील आहे. त्यामुळे अमेरिकेने ही ‘रेड लाईन’ कधीही ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. अमेरिकेने आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर संघर्ष अटळ आहे’, अशी धमकी चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग यांनी अमेरिकेला दिली.

tsai biden xiतैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन एप्रिल महिन्यात अमेरिकेचा दौरा करणार आहेत. यावेळी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष केविन मॅकॅर्थी यांची भेट घेतली. यावेळी तैवानच्या ताफ्यातील एफ-15 विमानांसाठी क्षेपणास्त्रांचा साठा पुरविण्यावर चर्चा अपेक्षित असल्याचा दावा केला जातो. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला धमकावले.

युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे दाखले देणारी अमेरिका तैवानबाबत चीनच्या सार्वभौमत्त्वाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. ‘तैवान हा चीनचा अंतर्गत मुद्दा आहे. तसेच चीनमधील तैवानला सामील करून घेण्याबाबतच्या पर्यायावर चीनचा विचार सुरू आहे. त्यामुळे अमेरिकेने तैवानबाबत आपल्या अधिकारांचे उल्लंघन करू नये. अन्यथा चीनबरोबर संघर्ष अटळ आहे’, असे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले. याआधीही चीनने तैवानच्या मुद्यावरुन अमेरिकेला लष्करी कारवाईची धमकी दिली होती.

leave a reply