अमेरिकेकडून युक्रेनला देण्यात येणारे शस्त्रसहाय्य घटण्याचे संकेत

- हंगेरीने युक्रेनचा शस्त्रपुरवठा रोखला

वॉशिंग्टन/किव्ह – अमेरिकेकडून युक्रेनला होणारा शस्त्रपुरवठा तसेच अर्थसहाय्य घटण्याचे संकेत मिळाले आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने विशेष विधेयक मंजूर करून युक्रेनसाठी जवळपास ५० अब्ज डॉलर्सची तरतूद केली होती. मात्र त्यातील बहुतांश निधी संपला असून केवळ सहा अब्ज डॉलर्स शिल्लक राहिल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेकडून मिळणारे सहाय्य कमी होण्याची शक्यता असतानाच युरोपातील हंगेरीनेही युक्रेनला मिळणारे ५० कोटी युरोचे शस्त्रसहाय्य रोखल्याचे वृत्त समोर आले आहे.

अमेरिकेकडून युक्रेनला देण्यात येणारे शस्त्रसहाय्य घटण्याचे संकेत - हंगेरीने युक्रेनचा शस्त्रपुरवठा रोखलारशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर अमेरिकी संसदेने युक्रेनसाठी विशेष कायदा करून मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा तसेच अर्थसहाय्याची तरतूद केली होती. ही तरतूद ४८ अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. ‘युक्रेन सिक्युरिटी असिस्टन्स इनिशिएटिव्ह’ असे नाव असलेल्या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदीपैकी ४० अब्ज डॉलर्सहून अधिक निधी खर्च झाला आहे. आता केवळ सहा अब्ज डॉलर्सचाच निधी उरल्याची माहिती अमेरिकी सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेतील आघाडीची न्यूज वेबसाईट असणाऱ्या ‘पॉलिटिको’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

युक्रेनकडून येत्या काही दिवसांमध्ये रशियाविरोधात प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेसाठी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्रीची आवश्यकता आहे. अमेरिका व युरोपिय देशांनी युक्रेनला अब्जावधी डॉलर्सचा शस्त्रपुरवठा केला असला तरी त्यातील बराचसा शस्त्रसाठा संपला आहे. नवी शस्त्रे युक्रेनच्या ताब्यात येऊन रणांगणावर त्याचा वापर होण्यास काही काळ जावा लागेल, असे सांगण्यात येते. अशा परिस्थितीत अमेरिकेकडून होणारा शस्त्रपुरवठा कमी होणे, ही बाब युक्रेनसाठी मोठा धक्का ठरु शकतो.अमेरिकेकडून युक्रेनला देण्यात येणारे शस्त्रसहाय्य घटण्याचे संकेत - हंगेरीने युक्रेनचा शस्त्रपुरवठा रोखला

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नुकताच युरोपचा दौरा करून मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठ्याचे आश्वासन मिळवले आहे. मात्र युरोपियन शस्त्रास्त्रे युक्रेनमध्ये दाखल होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या काळात अमेरिका व मित्रदेशांनी केलेला शस्त्रपुरवठा संपल्यास युक्रेनवर पराभवाची वेळ ओढवू शकते, असा इशारा काही विश्लेषक तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिला होता.

दरम्यान, हंगेरीने युरोपिय महासंघाकडून युक्रेनला देण्यात येणारे शस्त्रसहाय्य रोखल्याचे समोर येत आहे. पुढील आठवड्यात युक्रेनला देण्यात येणाऱ्या ५० कोटी युरोच्या शस्त्रपुरवठ्याच्या प्रस्तावाला हंगेरीने विरोध केला आहे. त्यामुळे युरोपकडून मिळणाऱ्या शस्त्रांना अधिक विलंब होण्याचे संकेत मिळत आहेत.

हिंदी

 

leave a reply