अमेरिका सौदीला ६५ कोटी डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करणार

- अमेरिकन सिनेटची मान्यता

वॉशिंग्टन – सौदी अरेबियाला ६५ कोटी डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सिनेटने मंजूर केला. मानवाधिकारांच्या उल्लंघनाप्रकरणी सिनेटच्या बायपार्टीशन समितीने सौदीला सदर शस्त्रपुरवठा करण्याविरोधात प्रस्ताव सादर केला होता. पण मंगळवारी सिनेटमध्ये झालेल्या मतदानात ६७-३० मतांनी या संरक्षण सहकार्याला मान्यता देण्यात आली.

अमेरिका सौदीला ६५ कोटी डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करणार - अमेरिकन सिनेटची मान्यताअमेरिकन सिनेटर रँड पॉल, बर्नी सँडर्स, एलिझाबेथ वॉरेन, पॅटी मरे यांनी सौदीसाठीच्या शस्त्रपुरवठ्या विरोधातील प्रस्तावाला समर्थन दिले होते. सौदीने येमेनमध्ये सुरू केलेले हल्ले आणि मानवाधिकारांचे हनन रोखण्यासाठी सदर शस्त्रसहाय्याला मंजुरी मिळू नये, अशी मागणी सँडर्स यांनी केली होती.

याआधीही काही सिनेटर्सनी सौदीबरोबरच्या संरक्षण सहकार्यावर आक्षेप घेतला होता. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी २०१९ साली निवडणूक प्रचारात सौदीला शस्त्रसहाय्य करणार नसल्याची घोषणा केली होती. अमेरिका सौदीला ६५ कोटी डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करणार - अमेरिकन सिनेटची मान्यतापण सिनेटच्या या निर्णयानंतर बायडेन प्रशासन सौदी अरेबियाला हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच संबंधित शस्त्रसाठा पुरविणार आहे.

येमेनमधील हौथी बंडखोरांकडून सौदीच्या शहरांवर होत असलेल्या रॉकेट व क्षेपणास्त्र हल्ल्यांचा विचार करता, हे सहकार्य आवश्यक असल्याचे व्हाईट हाऊसने या निर्णयानंतर जाहीर केले.

leave a reply