सौदीचे क्राऊन प्रिन्स युएईच्या दौर्‍यावर दाखल

रियाध – अरब मित्रदेशांच्या दौर्‍यावर असलेले सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बुधवारी युएईमध्ये दाखल झाले. युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायद यांनी स्वागत केले. तर सौदी-युएईमध्ये नवे युग सुरू झाल्याचे सौदीच्या क्राऊन प्रिन्सनी म्हटले आहे.

सौदीचे क्राऊन प्रिन्स युएईच्या दौर्‍यावर दाखलसोमवारपासून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’च्या सदस्य देशांचा दौरा सुरू केला आहे. ओमानपासून याची सुरुवात करून क्राऊन प्रिन्स बाहरिन, कतार आणि कुवैत या देशांना भेट देणार असल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. पण युएईच्या भेटीचे तपशील उघड करण्यात आले नव्हते.

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अरब मित्रदेशांच्या दौर्‍याची सुरुवात केली, त्याचदिवशी युएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहनून बिन झायद यांनी इराणला भेट दिली होती. इराण व युएईतील नव्या सहकार्याची ही सुरुवात असून यामुळे सौदीचे क्राऊन प्रिन्स युएईचा दौरा टाळतील, अशी चर्चा इराणी माध्यमांमध्ये सुरू झाली होती. पण सौदीचे क्राऊन प्रिन्स दोन दिवस युएईमध्ये थांबतील, असे सौदीने जाहीर करून इराणी माध्यमांच्या दाव्याची हवा काढून घेतली.

leave a reply