अमेरिका-तालिबानमध्ये कैद्यांची अदलाबदल

कैद्यांची अदलाबदलकाबुल – अमेरिका आणि अफगाणिस्तानातील तालिबानची राजवट यांच्यात कैद्यांची अदलाबादल पार पडली. अफगाणिस्तानच्या तुरुंगात असलेल्या अमेरिकी नौदल अधिकाऱ्याच्या मोबदल्यात ग्वांतानामो बे कारागृहातील तालिबानी कैद्याची सुटका केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तालिबानबरोबरच्या या तडजोडीची माहिती दिली.

२०२० साली अफगाणिस्तानात अमेरिकी नौदल अधिकारी मार्क फ्रेरिश याचे अपहरण करण्यात आले होते. गेली दोन वर्षे फ्रेरिश तालिबानच्या कैदेत होता. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या नौदल अधिकाऱ्याच्या सुटकेसाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू होते. तालिबानने देखील फ्रेरिशच्या मोबदल्यात गेली १७ वर्षे ग्वांतानामो बे कारागृहात कैद असलेल्या बाशर नुरझईच्या सुटकेची मागणी केली. बायडेन प्रशासनाने तालिबानची ही मागणी मान्य केली.

काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रेरिश आणि नुरझई यांची अदलाबदली करण्यात आल्याची माहिती तालिबानचा परराष्ट्र मंत्री आमिर खान मोत्ताकी याने दिली. अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर अमेरिकेने तालिबानबरोबर केलेली ही पहिली तडजोड ठरते.

leave a reply