चीनबरोबर तणाव वाढत असताना अमेरिकेकडून ‘मिनिटमन थ्री’ची चाचणी

Minuteman-IIIकॅलिफोर्निया – कॅलिफोर्नियाच्या वँडंबर्ग स्पेस फोर्स तळावरुन अमेरिकेच्या हवाईदलाने ‘मिनिटमन थ्री’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. मिनिटमन थ्री क्षेपणास्त्रामध्ये आण्विक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. स्पाय बलूनच्या मुद्यावरुन चीनबरोबरचा तणाव वाढत असताना ही चाचणी घेऊन अमेरिकेने आपली आण्विक सज्जता दाखवून दिल्याचा दावा केला जातो.

या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने 4200 मैल इतका प्रवास केला. पॅसिफिक महासागरातील मार्शल आयलँड्स येथील क्वायालिन द्विपसमुहापर्यंत मिनिटमन थ्रीचे रिएन्ट्री व्हिकल पोहोचले होते. मिनिटमन थ्री हे अमेरिकेच्या ‘न्युक्लिअर ट्रायड’चा भाग आहे. कॅलिफोर्नियाच्या हवाईतळावरुन मोबाईल लाँचरवरुन ही चाचणी घेण्यात आली. याआधी ट्रायडंट पाणबुडी तर लांब पल्ल्याच्या स्ट्रॅटेजिक तसेच स्टेल्थ बॉम्बर्स विमानातूनही या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे.

मिनिटमन थ्रीची ही चाचणी कुणा एका देशाविरोधात नसल्याचे अमेरिकेच्या हवाईदलाने म्हटले आहे.

leave a reply