अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर पाकिस्तानची गंभीरता जगाने पाहिली

- अफगाणिस्तानवर बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहणार्‍या पाकिस्तानला भारताने फटकारले

नवी दिल्ली – भारताने अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर या क्षेत्रातील प्रमुख देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक बोलावली होती. पाकिस्तान या बैठकीत सहभागी झाला नाही. हीच बाब अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर पाकिस्तान किती गंभीर आहे हे दाखवून देते, अशा शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला फटकारले. भारताने बोलावलेल्या बैठकीत रशिया, इराणसह एकूण सात देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाले होते. ‘अफगाणिस्तानची भूमी दहशतवादाचे केंद्र बनता कामा नये.

अफगाणिस्तानातील परिस्थितीवर भारताची चिंताअफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रश्‍नात इतर देशांचा हस्तक्षेप नसावा’, अशी ठाम भूमिका या सर्वांनी एकजुटीने घोषित केली होती. गुरुवारी पाकिस्तानने अफगाणिस्तान प्रश्‍नावर ट्रॉयका प्लस बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये चीन, रशिया आणि अमेरिकेचे प्रतिनिधी सहभागी झाले. या बैठकीत बोलतान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी अफगाणिस्तानमधील तालिबानच्या राजवटीला मान्यता दिली नाही, तर कितीतरी मोठ्या समस्या निर्माण होतील, असा इशारा दिला. तालिबानला आंतरराष्ट्रीय समुदायाशी संवाद हवा आहे. त्यामुळे तालिबानच्या राजवटीला आंंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता द्यावी. अन्यथा भूतकाळात अफगाणिस्तानला एकटे पाडल्याने ज्या समस्यांना सामोरे जावे लागले, तशीच वेळ पुन्हा आल्यावाचून राहणार नाही, अशी धमकी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. ९/११ सारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो, असा इशारा याद्वारे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री देत आहेत. याआधी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी असे इशारे दिले होते.

अफगाणिस्तानच्या तालिबान राजटीची कड घेऊन सतत बोलणार्‍या पाकिस्तानला या आघाडीवर फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. तालिबानची राजवटील जागातील प्रमुख देशांनी मान्यता द्यावी अशी सातत्याने मागणी करणार्‍या व तसे न झाल्यास पुढील आव्हानांबाबत इशारा देणारा पाकिस्तान भारताने अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर आयोजित केलेल्या महत्त्वाच्या बैठकीत गैरहजार होता. भारताने पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही एनएसए स्तरावरील या बैठकीचे आंमत्रण दिले होते. मात्र पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी आपण भारतात आयोजित बैठकीत सहभागी होणार नाही, असे गेल्या आठवड्यातच जाहीर केले. तर चीन या बैठकीत सहभागी होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे पाकिस्तानातही अस्वस्थता माजली होती. चीन बैठकीत सहभागी झाल्यास पाकिस्तान एकटा पडेल, अशी भिती पाकिस्तानी माध्यमांमधून व्यक्त करण्यात येत होती. पण या बैठकीच्या केवळ दोन दिवस आधी चीननेही आपला आधीचा कार्यक्रम निश्‍चित असल्याने बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला.

आंंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानला मान्यता द्यावी, यासाठी सतत इतर देशांना आवाहन करीत असलेले पाकिस्तान व चीन याच मुद्यावरील एका उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मात्र दुसर्‍या दिवशी पाकिस्तान झालेल्या बैठकीत चीन सहभागी झाला. याकडे आता विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर महत्त्वाच्या बैठकीत गैरहजर राहणार्‍या पाकिस्तान याबाबत किती गंभीर आहे, हे यातून दिसून येते, अशा शब्दात परराष्ट्र सचिव अरिंदम बागची यांनी फटकारले.

leave a reply