काबुलमधील बॉम्बस्फोटात सहा जण ठार

सहा जण ठारकाबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या मॅग्नेटिक बॉम्बच्या स्फोटात सहा जण ठार तर सात जण जखमी झाले. येथील अल्पसंख्यांकांच्या वस्तीत हा स्फोट घडविल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्याद्वारे सलग दुसर्‍या दिवशी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले. अफगाणी अल्पसंख्यांकांवरील या हल्ल्यांमागे ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना असल्याचा दावा केला जातो.

पश्‍चिम काबुलच्या ‘दश्त-ए बरची’ भागात शनिवारी मोठा स्फोट झाला. अफगाणिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या हजारा समुदयाच्या वस्तीजवळ उभ्या असलेल्या प्रवासी मिनीव्हॅनमध्ये मॅग्नेटिक बॉम्ब बसविला होता. हा स्फोट कानठळ्या बसविणारा होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने या हल्लयात एक ठार आणि दोन जखमी झाल्याचे सांगितले. पण तालिबानच्याच दहशतवाद्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर या स्फोटात सहा ठार झाल्याची माहिती दिली.

सहा जण ठारतर शुक्रवारी नांगरहार प्रांताच्या स्पिंघर भागात प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात तिघांचा बळी तर १७ जण जखमी झाले होते. सदर प्रार्थनास्थळ शियापंथियांचे होते. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी या स्फोटावर संताप व्यक्त केला. प्रार्थनास्थळांवरील हल्ले अत्यंत घृणास्पद घटना असल्याचे करझाई म्हणाले. सलग दोन दिवस अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना दहशतवादी लक्ष्य करीत असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

तर गेल्या दीड महिन्यात अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळावर झालेला हा तिसरा मोठा हल्ला ठरतो. याआधी कुंदूझ आणि कंदहार प्रांतात दहशतवाद्यांनी शियापंथियांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले होते. आधीच्या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी आयएस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. या दोन्ही स्फेटांमध्ये दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला होता. यानंतर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. अफगाणिस्तानचा ताबा घेणारी तालिबानची राजवट देशात सुरक्षा प्रस्थापित करू शकत नसल्याची टीका झाली होती. त्याचबरोबर सहा जण ठारअफगाणिस्तानातील आयएसचा वाढता प्रभाव जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा अमेरिकेच्या लष्करी अधिकार्‍यांनी दिला होता. पण तालिबानने अफगाणिस्तानात आयएसचा प्रभाव नसल्याचे सांगून या संघटनेचे दहशतवादी फारच कमी संख्येने असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अफगाणिस्तानात केलेल्या कारवाईत सहाशेहून अधिक आयएसच्या दहशतवाद्यांना अटक केल्याचे जाहीरही केले होते.

मात्र, सलग दोन दिवस नांगरहार आणि काबुलमध्ये झालेल्या स्फोटानंतर तालिबानच्या चिंतेत भर पडल्याचे दिसत आहे. कारण या दोन्ही स्फोटांबाबत तालिबानने अधिक तपशील जाहीर करण्याचे टाळले आहे. आयएसचेच दहशतवादी अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना लक्ष्य करीत नसून तालिबानचे दहशतवादी देखील शियापंथियांना टार्गेट करीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तालिबान अफगाणिस्तानच्या बामयान प्रांतातील शियापंथियांची ओळख पुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. काही तासांपूर्वी तालिबानच्या दहशतवाद्यांनी येथील शियापंथियांच्या नेत्याचा पुतळा स्फोटात उडवून दिला. तालिबानची ही कारवाई म्हणजे अफगाणींची ओळख पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप अफगाणी मानवाधिकार कार्यकर्त्याने केला आहे.

leave a reply