अफगाणी जनता सोव्हिएत रशियाप्रमाणे पाकिस्तानलाही पिटाळून लावेल

- अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह

काबुल – ‘१९७९ साली सोव्हिएत रशियाच्या लष्कराला अफगाणींनी ज्याप्रकारे आपल्या देशातून पिटाळून लावले, अगदी त्याचप्रकारे अफगाणी जनतेने पाकिस्तानलाही येथून हाकलून लावावे. यासाठी सशस्त्र उठावाची, आंतरराष्ट्रीय निषेधाची आणि पाकिस्तानवर निर्बंध टाकण्याची आवश्यकता आहे’, अशी अपेक्षा कॅनडाचे माजी मंत्री ख्रिस अलेक्झांडर यांनी व्यक्त केली आहे. तर संघर्षाची ही केवळ सुरूवात आहे, काही काळानंतर, अफगाणी जनता पाकिस्तानला नक्कीच आपल्या देशातून पिटाळून लावेल, असा विश्‍वास अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांनी व्यक्त केला आहे.

अफगाणी जनता सोव्हिएत रशियाप्रमाणे पाकिस्तानलाही पिटाळून लावेल - अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेहकॅनडाचे माजी मंत्री व काही काळासाठी अफगाणिस्तानातील कॅनडाचे राजदूत राहिलेल्या अलेक्झांडर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानवर ताशेरे ओढले. अफगाणिस्तानच्या अस्थैर्यासाठी पाकिस्तानच जबाबदार असल्याचा आरोप अलेक्झांडर गेले काही महिने करीत आहेत. तालिबानच्या हल्ल्यांआड पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसखोरी केल्याचा ठपका अलेक्झांडर यांनी ठेवला. त्यांच्या या आरोपांना अफगाणिस्तानात जोरदार प्रसिद्ध मिळत असून उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली.

अफगाणी जनता सोव्हिएत रशियाप्रमाणे पाकिस्तानलाही पिटाळून लावेल - अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह‘संघर्षाची ही केवळ सुरूवात असून काही काळानंतर, अफगाणी जनता पाकिस्तानला नक्कीच आपल्या देशातून पिटाळून लावेल’, असे सालेह यांनी म्हटले आहे. याबरोबरच सँक्शन पाकिस्तान अर्थात पाकिस्तानवर निर्बंध लादा, अशी मागणी अफगाणिस्तानात जोर पकडू लागली आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमन यांनी देखील पाकिस्तानवरील निर्बंधांची मागणी केली. ‘दहशतवाद, त्याचे समर्थक आणि प्रायोजक यांचा विनाश होवो’, असे फवाद अमन यांनी म्हटले आहे.

अफगाणी जनता सोव्हिएत रशियाप्रमाणे पाकिस्तानलाही पिटाळून लावेल - अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेहअफगाणिस्तानातील अस्थैर्यासाठी पाकिस्तान सर्वस्वी जबाबदार असल्याचा अफगाणी सरकार व सुरक्षा यंत्रणेचा आरोप आहे. पाकिस्तानच्या लष्करावरील आपले हे आरोप पोकळ नसून त्याचे पुरावे अफगाणिस्तानच्या सरकारने दिले आहेत. अफगाणिस्तानच्या ‘नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’चे प्रमुख अहमद शुजा जमाल यांनी आखातातील प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना पाकिस्तान तालिबानला शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचा ठपका ठेवला.

काही वर्षांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानात तैनात अमेरिकी जवानांवर हल्ले चढविण्यासाठी वापरलेली स्फोटकांसाठी वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट पाकिस्तानच्या दोन कारखान्यांमध्ये तयार केले जाते, अशी माहिती जमाल यांनी दिली.

leave a reply