अफगाणिस्तानच्या हेल्मंडमधील हवाई हल्ल्यात तालिबानसह पाकिस्तानचे ३० दहशतवादी ठार

काबुल – गेल्या चोवीस तासात लष्कराने अफगाणिस्तानच्या १५ प्रांतात केलेल्या कारवाईत तालिबानच्या ३८५ दहशतवाद्यांना ठार केले. यापैकी हेल्मंडमधील हवाई हल्ल्यात ठार झालेल्या तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये ३० पाकिस्तानींचा समावेश असल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. त्यामुळे अफगाणिस्तानातील संघर्षात पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना सहभागी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले.

अफगाणिस्तानच्या हेल्मंडमधील हवाई हल्ल्यात तालिबानसह पाकिस्तानचे ३० दहशतवादी ठारअफगाणिस्तानातील रक्तपातामागे पाकिस्तान असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघातील अफगाणिस्तानचे राजदूत गुलाम इसकझई यांनी काही तासांपूर्वी केला. आपण तालिबानची प्रवक्तेगिरी करीत नसल्याचा दावा पाकिस्तानने कितीहीवेळा केला तरी पाकिस्तानमध्ये तालिबानचे सुरक्षित स्वर्ग असल्याचा ठपका इसकझई यांनी ठेवला होता. तालिबानला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा पुरवठा पाकिस्तानातून केला जात असल्याचे इसकझई यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने आयोजित केलेल्या तातडीच्या सभेत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर मांडला.

गेल्या महिन्याभरात अफगाणिस्तानने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय बैठका, परिषदांमध्ये तालिबान आणि पाकिस्तानचा संबंध असल्याचे उघडपणे उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा आरोप केला होता. तर आंतरराष्ट्रीय स्तरातूनही पाकिस्तान व दहशतवाद्यांमधील सहकार्य उघड केले जात होते. तालिबानी दहशतवाद्यांची वाहने अफगाण-पाकिस्तानची सीमारेषा ओलांडत असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध होत आहेत.

कॅनडाचे माजी मंत्री ख्रिस अलेक्झांडर यांनी पाकिस्तान सीमेचा फोटो प्रसिद्ध केला. यामध्ये तालिबानचे दहशतवादी पाकिस्तानच्या सीमेतून अफगाणिस्तानात घुसखोरीच्या प्रतिक्षेत असल्याचा दावा अलेक्झांडर यांनी केला होता. अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी देखील अलेक्झांडर यांच्या दाव्याला दुजोरा दिला. यामुळे अफगाणिस्तानातून पाकिस्तानवर निर्बंध लादण्याची जोरदार मागणी सुरू झाली.

अफगाणिस्तानच्या हेल्मंडमधील हवाई हल्ल्यात तालिबानसह पाकिस्तानचे ३० दहशतवादी ठारअशा परिस्थितीत, अफगाणी लष्कराने हेल्मंड प्रांतात केलेल्या कारवाईत ३० पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याचे जाहीर करून पाकिस्तानचा पुन्हा एकदा पर्दाफाश केला. पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेले हेल्मंड प्रांत हे तालिबानसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दोन दशकांपूर्वी हेल्मंड प्रांत तालिबानचे सत्ताकेंद्र होते. त्याचबरोबर येथील अंमली पदार्थांच्या व्यापारावर तालिबान व या दहशतवादी संघटनेशी जोडलेल्या गटांची अर्थकारण अवलंबून होते. त्यामुळे हेल्मंड ताब्यात घेण्यासाठी तालिबान जोरदार प्रयत्न करीत असल्याचा दावा केला जातो.

हेल्मंडबरोबरच तालिबानने कंदहार, हेरात, जोवझान, कपिसा, नांगरहार, लोगार, गझनी, पाकतिका, मैदान वरदाक, बघलान, तखर, समांगन आणि फराह या प्रांतातील हल्ले तीव्र केले आहेत. अफगाणी लष्कर जमिनीवरील कारवाईबरोबर हवाई हल्ल्याने तालिबान व त्यांच्या साथीदारांना लक्ष्य करीत आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात तालिबानचे ३८५ दहशतवादी ठारतर २१० जखमी झाले.

गेल्या दोन दिवसांमध्ये अफगाणी लष्कराने तालिबानचे सुमारे ८०० दहशतवादी ठार केले आहेत. तर तालिबानने जोवझान प्रांताची राजधानी शेबेरघन ताब्यात घेतल्याचा दावा केला जातो. तर झारांज शहरातील कारागृहावर हल्ला चढवून तालिबानने आपल्या साथीदारांची सुटका केल्याची माहिती समोर येत आहे.

leave a reply