इराकमध्ये ऑस्ट्रेलियन दूतावासाच्या पथकावर बॉम्बहल्ला

बगदाद – इराकची राजधानी बगदाद येथे ऑस्ट्रेलियन दूतावासाच्या पथकावर शुक्रवारी बॉम्बहल्ला झाला. या स्फोटात कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती ऑस्ट्रेलियन दूतावासाने दिली. पण यामुळे इराकमधील राजकीय वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करू पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियाला इराकमधील काहीजणांनी इशारा दिल्याचे दिसत आहे.

बॉम्बहल्लागेल्या नऊ महिन्यांपासून इराकमध्ये राजकीय अस्थैर्य माजले आहे. इराकमधील निवडणुकीत मुक्तदा अल-सद्र यांचा पक्ष सर्वाधिक मतांनी विजयी ठरला. तरीही इराकमधील इराणसंलग्न राजकीय गट अल-सद्रला सत्ता स्थापन करण्यापासून रोखत आहे. हंगामी पंतप्रधान अल-कधीमी यांनी सद्र आणि इराणसंलग्न गटांमध्ये वाटाघाटी घडविण्याचा अपयशी प्रयत्न केला होता. त्याला यश मिळाले नव्हते. यानंतर अल-सद्र यांच्या समर्थकांनी इराकच्या संसदेचा तसेच प्रशासकीय इमारतींचा ताबा घेतला होता. यामुळे इराकमध्ये अराजक माजले होते. इराकमधील न्यायव्यवस्था देखील इराणसंलग्न गटांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करून सद्र गटाच्या समर्थकांनी न्यायालयासमोरही ठाण मांडले होते.

या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियाने सद्र आणि इराकमधील इराणसंलग्न गटांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण इराकमधील दोन्ही गट ऑस्ट्रेलियाचा हा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार नाहीत. शुक्रवारच्या बॉम्बस्फोटानंतर ही बाब उघड झ्ााली आहे. त्याचवेळी इराकमध्ये राजकीय स्थैर्य प्रस्थापित करण्याचे प्रयत्न मान्य नसलेल्या शक्तींनी या स्फोटाद्वारे ऑस्ट्रेलियाला याच्या परिणामांची जाणीव करून दिल्याचे दिसते.

leave a reply