बायडेन यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्सचा अपमान केला

- अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची टीका

वॉशिंग्टन – सौदी अरेबिया व इराणमध्ये समेट घडवून आणून चीनने आखाती क्षेत्रातील राजकारणातील आपला प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढविला आहे. चीनला मिळालेले हे यश म्हणचे अमेरिकेचे अपयश ठरते. याला बायडेन प्रशासनाची बेताल धोरणे जबाबदार असल्याची टीका अमेरिकेत सुरू झाली आहे. अमेरिकेचे लोकप्रतिनिधी व मुत्सद्दी यावर गंभीर चिंता व्यक्त करून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यामुळे आखाती क्षेत्रातील अमेरिकेचे हितसंबंध धोक्यात आल्याचा इशारा देत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाबरोबरील अमेरिकेच्या ताणलेल्या संबंधांना राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेनच जबाबदार असल्याची घणाघाती टीका केली आहे.

बायडेन यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्सचा अपमान केला - अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची टीका‘सौदी अरेबियाचे नेते अतिशय चांगले आहेत. ते अमेरिकेला सहाय्य करण्यासाठी उत्सुक देखील होते. पण बायडेन सौदीच्या दौऱ्यावर गेले आणि त्यांनी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना मुठीचा ठोसा देऊन शुभेच्छा दिल्या. याचा काय अर्थ होतो? माझ्याशी हात मिळवू नकोस, कारण तुझे हात बरबटलेले आहेत. बायडेन यांनी केलेला हा प्रकार म्हणजे सौदीच्या क्राऊन प्रिन्सचा अपमान होता’, अशी जळजळीत टीका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सौदीचा दौरा केला होता. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन बायडेन यांच्या स्वागतासाठी उभे होते. यावेळी मोटारीतून उतरलेल्या बायडेन यांनी राजशिष्टाचार व औपचारिकतेचा भाग म्हणून क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्याशी हस्तांदोलन करणे आवश्यक होते. पण बायडेन यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्स यांना ‘फिस्ट बम्प’ अर्थात मुठीचा ठोसा दिल्या. यावर अमेरिका, सौदीसह जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

युक्रेन युद्धामुळे युरोपिय देशांवर इंधन संकट कोसळलेले असताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सौदी व अरब मित्रदेशांकडून इंधनाचे सहकार्य मिळविणे आवश्यक होते. पण सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याबाबत बायडेन यांची पूर्वग्रहदूषित भूमिका अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी परिणामकारक ठरली. 2020 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारातच बायडेन यांनी पत्रकार जमाल खशोगी हत्याप्रकरणी क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्यावर आरोप केले होते. बायडेन यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्सचा अपमान केला - अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची टीकातसेच सत्तेवर आल्यास सौदीच्या क्राऊन प्रिन्सविरोधात भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यामुळे गेल्या वर्षीच्या आपल्या सौदी दौऱ्यात बायडेन यांनी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी हस्तांदोलन नाकारल्याचे उघड झाले होते. पण बायडेन यांच्या या भूमिकेमुळे सौदीसह आखातातील अरब मित्रदेशांनी इंधन संकटाबाबत अमेरिकेविरोधात भूमिका स्वीकारली. त्याचबरोबर सौदी व युएईने बायडेन यांचे फोनकॉल्स देखील नाकारल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याचा थेट फटका आखातातील मित्रदेशांबरोबरील अमेरिकेच्या पेट्रोडॉलर व्यवस्थेला बसणार असल्याचे इशारे विश्लेषकांनी दिले होते.

गेल्या काही महिन्यांपासून चीनने सौदी तसेच इतर अरब देशांबरोबरील सहकार्य वाढविले आहे. त्याचबरोबर इंधनाचे व्यवहार डॉलरपेक्षा युआन या चिनी चलनात करण्याचे संकेत या अरब देशांनी दिले आहेत. त्यामुळे बायडेन यांच्या बेताल धोरणांमुळे आखातातील अमेरिकेचा प्रभाव कमी झाला असून चीनला या क्षेत्रात यश मिळत चालले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बायडेन यांच्या याच बेजबाबदार धोरणांवर सडकून टीका करीत आहेत.

चीनप्रकरणी 65 टक्के अमेरिकन जनतेचा बायडेन यांच्यावर अविश्वास – प्यू रिचर्स सेंटरचा नवा सर्वेक्षण अहवाल

वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चीनला यशस्वीरित्या हाताळू शकत नाहीत, असे अमेरिकेतील सुमारे 65 टक्के जनतेला वाटत आहे. यापैकी 37 टक्के नागरिकांनी बायडेन यांच्या नेतृत्वावर अजिबात विश्वास नसल्याचे म्हटले आहे. तर आर्थिक आघाडीवर चीनला हाताळण्यातही राष्ट्राध्यक्ष बायडेन चांगले निर्णय घेऊ शकत नसल्याचे 61 टक्के जनतेला वाटत आहे.चीनप्रकरणी 65 टक्के अमेरिकन जनतेचा बायडेन यांच्यावर अविश्वास - प्यू रिचर्स सेंटरचा नवा सर्वेक्षण अहवाल

‘प्यू रिसर्च सेंटर’ या जगप्रसिद्ध संघटनेने प्रसिद्ध केलेल्या नव्या सर्वेक्षण अहवालात बायडेन यांच्यावरील अमेरिकन जनतेच्या अविश्वासाने नवी उंची गाठल्याचे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेऊन दोन वर्षे उलटली आहेत. या काळात बायडेन यांची लोकप्रियता अधिकाधिक लयाला जात असल्याचे अमेरिकेतील माध्यमे, विश्लेषक, अभ्यासगट व सर्वेक्षण संघटना सांगत आहेत. बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांमुळे चीनचे फावल्याची टीकाही अमेरिकन जनता उघडपणे करू लागली आहे.

 

चीनच्या हल्ल्यानंतर अमेरिका तैवानच्या मदतीला येणार नाही – तैवानी जनतेची भीती

तैपेई – गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या युक्रेनच्या युद्धात रशियाकडून प्रत्युत्तर मिळेल म्हणून अमेरिकेने आपले लष्कर तैनात करण्याचे टाळले आहे. अमेरिकेचे बायडेन प्रशासन युरोपला सहाय्य करणार नसतील, तर चीनने आमच्यावर हल्ला चढविला तर अमेरिका तैवानच्या मदतीला कसा येईल, अशी भीती तैवानची जनता व्यक्त करीत आहे. अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने यासंबंधीची बातमी प्रसिद्ध केली.चीनच्या हल्ल्यानंतर अमेरिका तैवानच्या मदतीला येणार नाही - तैवानी जनतेची भीती

अमेरिकेने ‘वन चायना पॉलिसी’ला मान्यता दिली आहे. त्यामुळे तैवान हा स्वायत्त देश असल्याचे अमेरिकेने मान्य केलेले नाही, याकडे तैवानची जनता लक्ष वेधत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवानच्या सुरक्षेबाबत घोषणा केली असली तरी वास्तव वेगळे असू शकते. नेमक्या परिस्थितीतील आपले हितसंबंध लक्षात घेऊन अमेरिका आपल्या भूमिकेत बदल करू शकते, अशी चिंता तैवानची जनता व्यक्त करीत आहे.

हिंदी

 

leave a reply