ब्राझिल व अर्जेंटिना द्विपक्षीय व्यापारातून अमेरिकी डॉलर वगळणार

ब्रासिलिया – लॅटिन अमेरिकेतील आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या ब्राझिल व अर्जेंटिनाने द्विपक्षीय व्यापारातून अमेरिकी डॉलर हद्दपार करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेझ सध्या ब्राझिलच्या दौऱ्यावर असून यावेळी झालेल्या चर्चेत ‘डि-डॉलरायझेशन’च्या मुद्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही महिन्यांपूर्वी या दोन्ही देशांनी समान चलन विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे वृत्तही समोर आले होते.

ब्राझिल व अर्जेंटिना द्विपक्षीय व्यापारातून अमेरिकी डॉलर वगळणारब्राझिल व अर्जेंटिना हे दोन्ही देश लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. मात्र गेल्या काही वर्षात अर्जेंटिनाची आर्थिक स्थिती वेगाने खालावण्यास सुरुवात झाली आहे. कर्जाचा प्रचंड बोजा, भडकलेली महागाई व परकीय चलनाचा तुटवडा यामुळे अर्जेंटिनात मंदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर वित्तसंस्थांकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यावर अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगण्यात येते.

या पार्श्वभूमीवर, अर्जेंटिनाने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अमेरिकी डॉलरचा वापर कमी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी अर्जेंटिनाने चीनबरोबरील व्यापारात युआन चलनाचा वापर करण्याबाबत महत्त्वाचा करार केला होता. आता लॅटिन अमेरिकेतील व्यापारी भागीदार देश असणाऱ्या इतर देशांबरोबरही डॉलरव्यतिरिक्त इतर चलनात व्यापार करण्याची तयारी अर्जेंटिनाने केली आहे. ब्राझिल हा अर्जेंटिनाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून दोन देशांमध्ये यापूर्वीही स्थानिक चलनांना प्र्राधान्य देण्याबाबत बोलणी झाली होती.

ब्राझिल व अर्जेंटिना द्विपक्षीय व्यापारातून अमेरिकी डॉलर वगळणारगेल्या शतकात १९८७ साली ब्राझिल व अर्जेंटिनामध्ये ‘गानुचो’ नावाने समान चलन स्थापन करण्याबाबत ‘प्रोटोकॉल’वर स्वाक्षरी करण्यात आली होती. यात समान चलन स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर यासंदर्भात विशेष पावले उचलण्यात आलेली नाहीत. १९९०च्या दशकात समान चलनाचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. त्यानंतर १९९४ साली ब्राझिल व अर्जेंटिना याच देशांनी पुढाकार घेऊन ‘मर्कोसूर’ नावाच्या गटाची स्थापना केली. लॅटिन अमेरिकी देशांची सामायिक बाजारपेठ उभारणे हा या गटाच्या स्थापनेचा उद्देश होता.

सध्या मर्कोसूरमधील सहकार्य थंडावले असले तरी ब्राझिल व अर्जेंटिनामध्ये बुधवारी झालेली चर्चा आणि स्थानिक चलनांच्या वापराला प्राधान्यावर झालेले एकमत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ब्राझिल सरकारने डॉलरचा वापर न करता अर्जेंटिनात निर्यात करणाऱ्या कंपन्यांना अर्थसहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे. ब्राझिल व अर्जेंटिना द्विपक्षीय व्यापारातून अमेरिकी डॉलर वगळणारही गोष्ट दोन देशांमधील व्यापारी व्यवहारांच्या दृष्टीने निर्णायक वळण ठरु शकते, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

गेल्या महिन्यात चीनचा दौरा करणारे ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी, अमेरिकी डॉलरच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून स्थानिक चलनांचा मुद्दा उपस्थित केला होता. जानेवारी महिन्यात अर्जेंटिना दौऱ्यापूर्वी लिहिलेल्या एका लेखातही त्यांनी स्थानिक चलनाच्या वापराबाबत आग्रही भूमिका मांडली होती. ‘दोन देशांमधील आर्थिक व्यवहार व इतर देवाणघेवाण यामध्ये असलेले अडथळे दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. स्थानिक चलनांचा वापरासंदर्भातील नियम अधिक सुटसुटीत करून त्यात सुधारणा केली जाईल’, असे ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या लेखात म्हटले होते.

हिंदी

 

leave a reply