इस्रायलच्या जेरुसलेममध्ये बसवर गोळीबार

- आठ जण जखमी

जेरुसलेम – इस्रायलच्या जेरुसलेममध्ये हल्लेखोराने प्रवासी बस आणि एका मोटारीवर केलेल्या गोळीबारात आठ जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोर पॅलेस्टिनी नागरिक असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलींवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.

इस्रायलच्या जेरुसलेममध्ये बसवर गोळीबार - आठ जण जखमीशनिवारी रात्री उशिरा वेस्टर्न वॉलच्या परिसरातील कार पार्किंग भागात उभ्या असलेल्या प्रवासी बस आणि मोटारीवर हल्लेखोराने बेछूट गोळीबार केला. यामध्ये जखमी झालेल्या आठ प्रवाशांपैकी एका गर्भवती महिलेची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘जे आमचे वाईट करू इच्छितात त्यांना या हल्ल्याची जबर किंमत चुकवावी लागेल’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान लॅपिड यांनी दिला आहे. हल्लेखोराच्या अटकेनंतर पूर्व जेरुसलेममधील सिलवान

काही दिवसांपूर्वीच वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या फताह पक्षाशी संलग्न असलेल्या सशस्त्र संघटनेतील तिघाजणांना दहशतवादी कारवायांप्रकरणी अटक करण्यात आली होती. तर गेल्या महिन्यात पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणेतील जवानानेच इस्रायली जवानांवर गोळीबार केला होता. आजवर गाझापट्टीतील हमास व इतर जहालमतवादी संघटनांच्या तुलनेत वेस्ट बँकमधील संघटना मवाळ व उदार असल्याचे मानले जात होते. पण आता परिस्थिती बदलली असून वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी तरुणही कट्टवादाकडे झुकत असल्याचे दिसू लागले आहे, असे बजावून इस्रायली विश्लेषकांनी आपल्या सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे.

leave a reply