कॅनडाकडून चीनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी

- दोन देशांमधील तणाव अधिकच चिघळला

टोरोंटो/बीजिंग – कॅनडातील माजी मंत्री व संसद सदस्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी याची घोषणा केली. कॅनडाच्या या कारवाईवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने दिला आहे. या नव्या वादामुळे कॅनडा व चीनमधील तणाव अधिकच चिघळल्याचे संकेत मिळत आहेत.

कॅनडाकडून चीनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी - दोन देशांमधील तणाव अधिकच चिघळलादोन वर्षांपूर्वी कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून कॅनडाच्या राजकीय व्यवस्थेत होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत अहवाल सादर केला होता. यात चीनची राजवट कॅनडातील संसद सदस्य व त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करीत असल्याकडे लक्ष वेधले होते. अहवालात संसद सदस्याच्या नावाचा उल्लेख नव्हता. मात्र कॅनडातील माध्यमांनी मायकल वाँग यांच्यावर दडपण आणले जात असल्याचे वृत्त उघड केले होते. या घटनेने कॅनडाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी कॅनडा सरकारने चीनच्या सत्ताधारी राजवटीबरोबर संवाद साधून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. मात्र चीनच्या राजवटीने योग्य सहकार्य करण्याचे नाकारल्याने कॅनडाने चिनी राजनैतिक अधिकाऱ्याच्या हकालपट्टीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. ‘कॅनडाच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारचा परदेशी हस्तक्षेप खपवून घेण्यात येणार नाही. कॅनडातील राजनैतिक अधिकाऱ्यांबाबत जर अशा प्रकारचे वर्तन आढळले तर त्यांना मायदेशी धाडण्यात येईल. कॅनडाकडून चीनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी - दोन देशांमधील तणाव अधिकच चिघळलायाबाबत आधीच इशारा देण्यात आला आहे’, या शब्दात परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी चिनी अधिकाऱ्याच्या हकालपट्टीचे समर्थन केले.

कॅनडाच्या टोरोंटो शहरात असणाऱ्या चीनच्या वाणिज्य दूतावासातील वरिष्ठ राजनैतिक अधिकारी झाओ वेई यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री व संसद सदस्य असणाऱ्या मायकल वाँग यांनी चीनच्या राजवटीकडून उघुरवंशियांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. उघुरवंशियांवरील कारवाई म्हणजे वंशसंहार आहे, हा ठराव संसदेत मांडण्यासाठी वाँग यांनी पुढाकार घेतला होता. कॅनडातील चिनी वंशांच्या समुदायावर दडपण आणण्याचे व त्यांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दाही वाँग यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे चिडलेल्या चिनी राजवटीने त्यांच्यावर निर्बंधही लादले होते. मात्र फक्त निर्बंधांवर न थांबता चिनी राजवटीने वाँग यांचे चीनमधील नातेवाईक व परिचितांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या मुद्यावरून कॅनडातील माध्यमे तसेच विरोधी पक्षाने सरकारला सातत्याने धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर दबावाखाली कॅनडा सरकारने चिनी अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्याचे मानले जाते.

हिंदी

 

leave a reply