काबुलमधील हल्ल्यानंतर चीन अफगाणिस्तानातून माघार घेण्याची शक्यता

आखातातील वर्तमानपत्राचा दावा

kabul hotel attackरियाध – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जबर धक्का चीनला बसला आहे. या हल्ल्यानंतर चीनने आपल्या नागरिकांना ताबडतोब अफगाणिस्तान सोडण्याचे आदेश दिले. यामुळे तालिबानबरोबरच्या संबंधावर फेरविचार करून आणि अफगाणिस्तानातील आपली गुंतवणूक अर्धवट सोडून चीन माघार घेईल. आखातातील आघाडीच्या वर्तमानपत्राने हा दावा केला आहे.

12 डिसेंबर रोजी काबुलमधील गेस्ट हाऊसवर ‘आयएस-खोरासन’च्या दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. यामध्ये चीनचे पाच नागरिक गंभीर जखमी झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या हल्ल्यात चीनचे काही नागरिक मारले गेल्याचे दावे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी हा घृणास्पद हल्ला असल्याचे सांगून यामुळे चीनला जबरदस्त धक्का बसल्याचे म्हटले होते.

taliban chinaतर दुसऱ्या दिवशी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांना सर्व प्रकल्प व कामे अर्धवट सोडून मायदेशी परतण्याची सूचना केली होती. तालिबानच्या राजवटीने चिनी नागरिकांच्या सुरक्षित माघारीची सोय करावी, अशी मागणी चीनने केली होती. या एका सूचनेद्वारे चीनने अफगाणिस्तानातून माघार घेत असल्याचे संकेत दिले आहेत, असे ‘अल अरेबिया पोस्ट’ या आखाती वर्तमानपत्राचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानातील सूत्रे हातात घेतल्यानंतर चीनने तालिबानसह सहकार्य प्रस्थापित करण्याला प्राधान्य दिले होते. गेल्या वर्षभरात चीनने अफगाणिस्तानला कोट्यवधी डॉलर्सचे सहाय्य पुरविले आहेत. त्याचबरोबर वाखण कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी चीन प्रयत्न करीत आहे. पण वर्षभर उलटल्यानंतरही वाखण कॉरिडॉरचे काम पुढे सरकले नसल्याची नाराजी चीनमध्ये वाढत आहे. अशा परिस्थितीत, गेल्या आठवड्यात आयएस-खोरासान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानातील चीनच्या हितसंबंधांना लक्ष्य केले. यामुळे अफगाणिस्तानातून माघार घेणारी चीनची 80 टक्के गुंतवणूक पुन्हा या देशात परतणार नसल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

leave a reply