चीनच्या चिथावणीखोर हालचाली मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देत आहेत

- अमेरिकेचा चीनला इशारा

चिथावणीखोर हालचालीवॉशिंग्टन – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रावर अधिकार सांगणाऱ्या आग्नेय आशियाई देशांच्याविरोधात चीनच्या बेजबाबदार आणि चिथावणखोर हालचाली या क्षेत्रातील मोठ्या संकटाला आमंत्रण देत आहेत. चीन आग्नेयआशियाई आणि पाश्चिमात्य देशांच्या संयमाची परिक्षा घेत आहे, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील ईस्ट एशिया गटाच्या उपमंत्री जूंग पाक यांनी दिला. गेल्या महिन्यात चीनने ‘साऊथ चायना सी’च्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या ऑस्ट्रेलियन लढाऊ विमानाजवळून धोकादायक प्रवास केला होता. तर फिलिपाईन्सच्या विशेष आर्थिक सागरी क्षेत्रात चीनच्या जहाजांनी उत्खनन सुरू केल्याच्या तीन घटना घडल्या होत्या. याचा उल्लेख करून जूंग पाक यांनी चीनच्या या क्षेत्रातील हालचाली चिथावणखोर आणि धोकादायक बनल्याची टीका केली.

चिथावणीखोर हालचालीकाही तासांपूर्वीच अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी देखील चीनच्या या क्षेत्रातील लष्करी हालचाली अतिशय चिंताजनक असल्याचे म्हटले होते. दरम्यान, पुढच्या आठवड्यात कंबोडिया येथे अमेरिका व आग्नेय आशियाई देशांची बैठक पार पडणार आहे. त्याआधी अमेरिकेने साऊथ चायना सी क्षेत्रातील चीनच्या घुसखोरीचा मुद्दा उचलून धरला आहे.

leave a reply