चीनने कोरोनाच्या उगमाची सर्व माहिती पुरवावी

- ‘डब्ल्यूएओ’च्या प्रमुखांची चीनकडे मागणी

जीनिव्हा – ‘या आठवड्यात चीनने कोरोनाव्हायरसबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालातून या विषाणूच्या उगमाविषयी काही संदर्भ मिळत आहेत. पण ‘जागतिक आरोग्य संघटने’ला (डब्ल्यूएचओ) आवश्यक उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे चीनने कोरोनाच्या उगमाची सर्व माहिती डब्ल्यूएचओला पुरवावी. त्यानंतर याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होऊ शकेल’, अशी मागणी या संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्युएस यांनी केली. या संदर्भात चीनची अपारदर्शी भूमिका असमर्थनीय असल्याची टीका डब्ल्यूएचओच्या अन्य अधिकाऱ्यांनी केली.

चीनने कोरोनाच्या उगमाची सर्व माहिती पुरवावी - ‘डब्ल्यूएओ’च्या प्रमुखांची चीनकडे मागणी२०१९ साली चीनच्या वुहान प्रांतातून संसर्गित झालेल्या कोरोनाने जगभरात आत्तापर्यंत जवळपास ६९ लाख जणांचा बळी घेतला आहे. एकट्या अमेरिकेत ११ लाख तर युरोपिय महासंघातील सदस्य देशांमध्ये १२ लाखांहून अधिक जण कोरोनाने दगावले आहेत. या विषाणूचा फैलाव चीनच्या वुहान जैव प्रयोगशाळेतून झाल्याचा आरोप अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. चीनमधून पलायन केलेल्या काही नागरिकांनी देखील कोरोनाच्या साथीसाठी चीन जबाबदार असल्याचा दावा केला होता.

वुहान प्रयोगशाळेत चीनने कोरोना तसेच याहून अधिक भयानक विषाणूंवर संशोधन केले आहे. चीनने शत्रूच्या विरोधात या विषाणूंचा वापर जैविक हत्यारासारखा करण्याची तयारी केल्याचे आरोप आंतरराष्ट्रीय नेते व विश्लेषकांनी केले होते. चीनने आपल्यावरील आरोप फेटाळून या विषाणूच्या फैलावासाठी कधी इटली तर कधी अमेरिकाच जबाबदार असल्याचा प्रत्यारोप चीनने केला होता. सुरूवातीच्या काळात डब्ल्यूएचओने देखील चीनवर होणाऱ्या आरोपांकडे दुर्लक्ष केले होते. चीनने कोरोनाच्या उगमाची सर्व माहिती पुरवावी - ‘डब्ल्यूएओ’च्या प्रमुखांची चीनकडे मागणीपण आंतरराष्ट्रीय स्तरातून झालेल्या टीकेनंतर डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी चीनकडे याप्रकरणी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सुरुवातीला चीनने वुहान प्रयोगशाळेतील प्रयोगांची माहिती उघड करण्यास टाळाटाळ केली होती. गेल्या आठवड्यात कोरोनाच्या उगमाबाबतचा अहवाल प्रसिद्ध करुन चीनने याप्रकरणी होणाऱ्या आरोपांपासून निसटण्याचा प्रयत्न केला होता. पण डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ संशोधिका डॉ. मारिया वॅन केरखोव्ह यांनी चीन कोरोनाच्या उगमाबाबत महत्त्वाची माहिती दडवित असल्याची टीका केली. चीनची ही अपारदर्शी भूमिका कोरोनाविषयी संशोधन करण्यात अडथळे निर्माण करीत असल्याचे ताशेरे केरखोव्ह यांनी ओढले. तर डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी देखील चीनला सदर माहिती पुरविण्यासाठी दबाव टाकला. पण आपल्या अपारदर्शी व्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेला चीन याप्रकरणी डब्ल्यूएचओला सहाय्य करील, याची खात्री देता येणार नाही.

leave a reply