भारतातील क्वाडच्या बैठकीमुळे चीन अस्वस्थ

- ‘एशियन नाटो’ अपयशी ठरेल अशी चीनची टीका

‘एशियन नाटो’बीजिंग – मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राला क्वाड देशांचा कायम पाठिंबा असेल. तसेच कुठल्याही प्रकारे इथली यथास्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांना क्वाडचा विरोध असेल, अशी घोषणा गेल्याच आठवड्यात नवी दिल्लीत पार पडलेल्या क्वाडच्या बैठकीत करण्यात आली होती. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने अमेरिकेवर तोफ डागली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांची ‘एशियन नाटो’ उभारून चीनला घेरण्याचा अमेरिकेचा हा प्रयत्न अपयशी ठरणार आहे, अशी टीका चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग यांनी केली. पण क्वाडच्या बैठकीवर निशाणा साधताना चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताबाबत बोलण्याचे किंवा तसा प्रश्न घेण्याचेही कटाक्षाने टाळले.

गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत जी20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अमेरिका, रशिया, जपान, ऑस्ेलिया, ब्रिटनसह चीनचे परराष्ट्रमंत्री देखील सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या या बैठकीनंतर भारत, अमेरिका, जपान व ऑस्ेलिया या क्वाड देशांची बैठक देखील संपन्न झाली. यावेळी ‘स्वतंत्र्य, कायद्याचे पालन, सार्वभौमत्त्व व क्षेत्रिय एकात्मता, बळाचा वापर करण्याच्या धमक्या न देता वाद सामोपचाराने सोडविण्याचे प्रयत्न आणि या क्षेत्रात सागरी व हवाई वाहतुकीचे स्वातंत्र्य’ यांचा क्वाड देश पुरस्कार करीत असल्याचे संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आले.

थेट उल्लेख न करता इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांना क्वाडच्या या संयुक्त निवेदनात लक्ष्य करण्यात आले होते. त्यावेळी चीनने मर्यादित शब्दांमध्ये या बैठकीवर आपली नाराजी व्यक्त केली होती. पण मंगळवारी चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग यांनी आपल्या पहिल्या पत्रकार बैठकीत क्वाडच्या बैठकीवर उत्तर देताना अमेरिकेवर टीकेची झोड उठविली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मुक्त आणि खुल्या वाहतूकीचा मुद्दा उपस्थित करणारी अमेरिका या क्षेत्रातील देशांना चिथावणी देत असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. युरोपिय देशांच्या नाटोप्रमाणे अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना एकत्र घेऊन एशियन नाटो उभारीत असल्याचा ठपका गँग यांनी ठेवला. पण चीनला घेरण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेले प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचा दावा चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

आपल्या पहिल्याच पत्रकार बैठकीत किन गँग रशियाबरोबरचे संबंध तसेच अमेरिका-तैवान, युरोपिय महासंघ आणि जपानच्या मुद्यांवर सर्व देशांवर टीका केली. असियान देशांचा मुद्दा मांडतानाही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेवर निशाणा साधला. पण या पूर्ण पत्रकार बैठकीत चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताबाबतचा प्रश्न घेण्याचे सध्यातरी टाळले आहे.

दरम्यान, भारतात पार पडलेल्या जी20च्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला यश मिळाल्याचा दावा केला जातो. तर येत्या काही दिवसात जपानचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. जपान सध्या जी7 बैठकीचे आयोजन करीत आहे. भारताने या बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन जपानचे पंतप्रधान करण्याची शक्यता आहे. तर याच आठवड्यात ऑस्ेलियाचे पंतप्रधानही भारतात येत आहेत. जपान व ऑस्ेलियाच्या पंतप्रधानांचे हे भारत दौरे चीनला व्यथित करणारे असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

leave a reply