जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ७१ लाखांवर

बाल्टिमोर – जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये सातत्याने भर पडत असून ही संख्या आता ७१ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाव्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या ४ लाख सात हजारांवर गेली आहे. अमेरिका व ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठी असली तरी आशियातील इराण, सौदी अरेबिया, पाकिस्तान व इंडोनेशिया हे देश कोरोनाचे नवीन ‘हॉटस्पॉट’ म्हणून समोर येत आहेत. त्याचवेळी न्यूझीलंडने, कोरोनाच्या साथीतून मुक्त झाल्याची घोषणा केली आहे.

कोरोना साथ, रुग्ण,

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी व ‘वर्ल्डओमीटर’ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बळींची संख्या ४,०७,०६८ झाली असून गेल्या २४ तासांमध्ये ३,९८८ जण दगावले आहेंत. जगातील रुग्णांची एकूण संख्या ७१,३६,७५६ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये जगात १,०९,५६५ रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत एकूण १,१६,९३३ जणांचा बळी गेला असून गेल्या २४ तासांमध्ये ७,०८७ जणांची भर पडली आहे. अमेरिकेतील रुग्णांची एकूण संख्या १९,४६,५५५ झाली आहे. २४ तासांमध्ये अमेरिकेत २४,५०१ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

कोरोना साथ, रुग्ण,

ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासात ५२५ जणांचा बळी गेला असून एकूण बळीची संख्या ३६,५४७ झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६,९३,४१९ झाली आहे. २४ तासात त्यात १८,९१२ जणांची भर पडली आहे. ब्राझीलपाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील पेरू देशात रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून एकूण रुग्ण १,९६,५१५ नोंदविण्यात आले आहेत. जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या देशांच्या यादीत पेरू आठव्या क्रमांकावर आला आहे.

आशिया खंडात इराण, सौदी अरेबिया, पाकिस्तान व इंडोनेशिया हे देश कोरोना साथीचे नवे हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत. इराणमधील रुग्णांची एकूण संख्या १,७३,८३२ झाली असून एकूण बळी ८,३५१ आहेत. पाकिस्तानातही रुग्णांची संख्या एक लाखांवर गेली असून एकूण २,१२१ जण दगावले आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

leave a reply