‘ल्युनर न्यू इयर’च्या पार्श्‍वभूमीवर पूर्व आशियाई देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला

- रशियातही विक्रमी रुग्णसंख्येची नोंद

टोकिओ/सेऊल/मॉस्को – चीनसह पूर्व व आग्नेय आशियाई देशांमध्ये साजर्‍या होणार्‍या ‘ल्युनर न्यू इयर’ उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया व व्हिएतनाम या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी चीननेही बैस या शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन घोषित केला आहे. रशियातही रुग्णसंख्या वाढत असून २४ तासांमध्ये जवळपास दोन लाख रुग्णांची नोंद झाल्याचे समोर आले आहे.

‘ल्युनर न्यू इयर’च्या पार्श्‍वभूमीवर पूर्व आशियाई देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला - रशियातही विक्रमी रुग्णसंख्येची नोंदनोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिअंट समोर आला होता. या नव्या व्हेरिअंटमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेला सुरुवात झाली होती. या लाटेत सर्वाधिक फटका अमेरिका व युरोपला बसल्याचे समोर आले होते. मात्र गेल्या काही दिवसात या क्षेत्रातील रुग्णसंख्या घटत असतानाच आशियाई देशांमधील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामागे पूर्व तसेच आग्नेय आशियाई देशांमध्ये पार पडलेले ‘ल्युनर न्यू इयर’ कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

‘ल्युनर न्यू इयर’च्या पार्श्‍वभूमीवर पूर्व आशियाई देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला - रशियातही विक्रमी रुग्णसंख्येची नोंदजपानमध्ये बुधवारी कोरोनाचे ९७,८३५ रुग्ण आढळले असून १६२ जणांचा बळी गेला आहे. राजधानी टोकिओसह क्योटो, मियागी, ओसाका या शहरांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. जपानमधील एकूण रुग्णसंख्या ३५ लाखांवर गेली असून दगावणार्‍यांची संख्या २० हजारांनजिक पोहोचली आहे. जपानचा शेजारी देश असणार्‍या दक्षिण कोरियातही कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. गुरुवारी दक्षिण कोरियात ५४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून यामागे वेगाने फैलावणारा ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे दक्षिण कोरियात गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या चार पटींनी वाढली आहे.

‘ल्युनर न्यू इयर’च्या पार्श्‍वभूमीवर पूर्व आशियाई देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला - रशियातही विक्रमी रुग्णसंख्येची नोंदआग्नेय आशियातील व्हिएतनाम, इंडोनेशिया व सिंगापूरमध्येही कोरोनाच्या संसर्गात वाढ दिसून आली आहे. व्हिएतनाममध्ये बुधवारी जवळपास २४ हजार रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या २४ लाखांवर गेली आहे. आतापर्यंत कोरोना साथीमुळे व्हिएतनाममध्ये सुमारे ३८ हजार जण दगावले आहेत. इंडोनेशियात गेले सहा दिवस सातत्याने २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. ‘ल्युनर न्यू इयर’च्या पार्श्‍वभूमीवर पूर्व आशियाई देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला - रशियातही विक्रमी रुग्णसंख्येची नोंदतर सिंगापूरमध्ये गेल्या दोन आठवड्यात रुग्णसंख्या दुप्पट झाल्याचे समोर आले आहे.

रशियात गेले आठवडाभर दररोज दीड लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. गुरुवारी रशियात एक लाख, ९७ हजारांहून अधिक रुग्णसंख्या आढळली असून हा कोरोना साथीच्या काळातील नवा रेकॉर्ड ठरला आहे. दरम्यान ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या प्रमुख अधिकारी मारिया केरखोव्ह यांनी, कोरोनाचा नवा ‘व्हेरिअंट’ दाखल होण्याची शक्यता वर्तविली आहे. ओमिक्रॉन व्हेरिअंटचे काही ‘सबव्हेरिअंट’ आढळले असून त्यातील एखादा व्हेरिअंट ‘वाईल्ड कार्ड’ ठरू शकतो, असे केरखोव्ह यांनी बजावले.

leave a reply