‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चे संकट हवामानबदलाहून अधिक तीव्रतेचे

- संशोधक जॉफ्रे हिन्टन यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘हवामानबदलाच्या समस्येची तीव्रता कमी आहे व त्याची चिंता करू नका असे मी सांगणार नाही. हवामानबदल ही देखील मोठीच समस्या आहे. मात्र आर्टिफिशल इंटेलिजन्सपासून असलेला धोका अधिक तातडीचा व जास्त महत्त्वाचा वाटतेो’, असा इशारा ‘जनरेटिव्ह एआय’ विकसित करणारे संशोधक जॉफ्रे हिन्टन यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीच हिन्टन यांनी ‘एआय’चा वापर विघातक गोष्टींसाठी केला जाऊ शकतो, असे बजावले होते. तर स्टॅन्फोर्ड विद्यापीठाच्या अहवालात, आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे जगासमोर आण्विक संकट उभे राहू शकते, याची जाणीव करून देण्यात आली होती.

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चे संकट हवामानबदलाहून अधिक तीव्रतेचे - संशोधक जॉफ्रे हिन्टन यांचा इशारागेल्या काही वर्षात आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मुद्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेक क्षेत्रांमधील समस्या व अडचणी दूर होण्याचे दावे करण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला या तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर कोणाचेही नियंत्रण राहणार नसल्याकडे लक्ष वेधून त्याच्या धोक्यांबाबत बजावण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे जगातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी गुगलमध्ये कार्यरत राहिलेल्या हिन्टन यांनी ‘एआय’चे धोके समोर आणण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवली होती.

त्यानंतर हिन्टन यांच्याकडून सातत्याने विविध माध्यमांमधून आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या (एआय) धोक्यांबाबत इशारे दिले जात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘एआय’चा वापर चुकीच्या माणसांकडून अथवा गटांकडून होईल व त्याचे विघातक परिणाम होतील, असे बजावले होते. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चे संकट हवामानबदलाहून अधिक तीव्रतेचे - संशोधक जॉफ्रे हिन्टन यांचा इशारात्यानंतर आता त्यांनी ‘एआय’च्या धोक्याची व्याप्ती जगातील इतर धोक्यांपेक्षा जास्त महत्त्वाची असल्याचे वक्तव्य करून लक्ष वेधले आहे.

‘कार्बनचे उत्सर्जन कमी करा असे सांगून व त्याच्या अंमलबजावणीमुळे हवामानबदलाचे परिणाम कमी होऊ शकतात. मात्र आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या बाबतीत असे शक्य नाही. आपण काय केले तर एआयचा धोका कमी होईल, याबाबत अजूनही संदिग्धता कायम आहे’, या शब्दात हिन्टन यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा धोका मोठा व तातडीचा असल्याची जाणीव करून दिली. मात्र धोका असला तरी यातील संशोधन पूर्णपणे थांबवणे हा त्यावरील उपाय नसल्याचा दावा त्यांनी केला.

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चे संकट हवामानबदलाहून अधिक तीव्रतेचे - संशोधक जॉफ्रे हिन्टन यांचा इशारामार्च महिन्यात अमेरिकास्थित ‘फ्युचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूट’ या अभ्यासगटाने आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रातील धोक्यांबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून खुले पत्र लिहिले होते. यात आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात सुरू असणारे मोठे प्रयोग व संशोधन सहा महिन्यांसाठी थांबविण्यात यावे, असे आवाहन केले होते. याचा संदर्भ देताना हिन्टन यांनी संशोधन रोखण्यास विरोध केला. मात्र त्याचवेळी, एआय मानवजातीच्या अस्तित्वाला धोका ठरु शकतो यावर आपला विश्वास असल्याचेही स्पष्ट केले.

हिन्टन यांच्यापूर्वी एआय क्षेत्रातील तज्ज्ञ एलिझर युडकोवस्की यांनी देखील, ‘स्मार्ट आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा विकास पृथ्वीवरील मानवजातीच्या विनाशासाठी कारणीभूत ठरु शकतो, असे बजावले होते. ‘एआय’च्या वापरामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील बेकारीचे संकट अधिक तीव्र होण्याची भीतीही वर्तविण्यात आली असून गोल्डमन सॅक्स या कंपनीने, ‘एआय’मुळे ३० कोटी जणांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ ओढवू शकते, असा भयावह निष्कर्ष नोंदविला होता.

हिंदी

 

leave a reply