तुर्कीचे चलन लिरातील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला धक्के बसण्याचे संकेत

अंकारा – तुर्कीचे चलन लिरात विक्रमी घसरण झाली असून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत त्याचे मूल्य ११ लिरांहून अधिक झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये लिराचे मूल्य चार टक्क्यांहून अधिक खाली आले असून उगवत्या अर्थव्यवस्था म्हणून ओळखण्यात येणार्‍या देशांच्या चलनात झालेली ही सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षात लिराचे मूल्य सातत्याने कोसळत असून यामागे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांची आततायी धोरणे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

तुर्कीचे चलन लिरातील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला धक्के बसण्याचे संकेतगुरुवारी तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चलन लिराचे अवमूल्यन थांबविण्यासाठी उपाय घोषित करण्यात येतील, असे मानले जात होते. मात्र प्रत्यक्षात या बैठकीत व्याजदर अधिक घटविण्याचा निर्णय घेण्यात आला. तुर्कीच्या चलनाला सातत्याने धक्के बसत असताना घेण्यात आलेला हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया विश्‍लेषक व अर्थतज्ज्ञांनी दिली आहे.

तुर्कीचे चलन लिरातील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला धक्के बसण्याचे संकेतआंतरराष्ट्रीय स्तरावरही याचे पडसाद उमटले असून लिराची मोठी घसरण त्याचाच भाग ठरतो. लिराचे मूल्य डॉलरच्या तुलनेत तब्बल ४.१ टक्क्यांनी घसरले. गुरुवारी एका अमेरिकी डॉलरसाठी ११.०८७७ लिरा मोजणे भाग पडल्याचे समोर आले. काही वर्षांपूर्वी एका अमेरिकी डॉलरसाठी पाच ते सहा लिरा मोजाव्या लागत होत्या. या पार्श्‍वभूमीवर ही घसरण लक्ष वेधून घेणारी ठरते.

तुर्कीचे चलन लिरातील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला धक्के बसण्याचे संकेतलिराच्या या घसरणीचा फटका तुर्की अर्थव्यवस्थेलाही बसत असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यावर्षी तुर्कीतील महागाईत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. लिराची घसरण व वाढती महागाई यामागे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून मध्यवर्ती बँकेवर टाकण्यात येणारा दबाव आणि इतर निर्णय कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन अर्थव्यवस्थेत अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आग्रही असल्याचे समोर येत आहे.

leave a reply