‘हॉर्न ऑफ आफ्रिका’मध्ये २०११ पेक्षाही भयंकर दुष्काळ

‘इगाड’चा इशारा

Drought-in-the-Horn-of-Africaजिबौती – २०११ साली ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’मध्ये आलेल्या दुष्काळाने २ लाख ६० हजार जणांचा बळी घेतला होता. पण यावर्षीचा दुष्काळ त्यापेक्षाही भयंकर ठरेल. आफ्रिकेच्या या भागातील सोमालिया, केनिया, युगांडा आणि इथिओपिया या देशांमध्ये सामान्यच्या खाली पाऊस अपेक्षित आहे. यामुळे या भागातील ८३ लाख जणांना मानवतावादी सहाय्य अपेक्षित असल्याचा इशारा ‘इगाडा’ या संघटनेने दिला.

आफ्रिकेच्या आठ देशांमधील व्यापारी गट म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘इंटरगव्हर्नमेंटल अथॉरिटी ऑन डेव्हलपमेंट-इगाडा’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हॉर्न ऑफ आफ्रिका सलग सहाव्यांदा दुष्काळाला सामोरे जाणार आहे. पण यंदाचा दुष्काळ या भागातील उपासमारीचे संकट वाढविणारे असेल, असे इगाडाचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोमालिया दुष्काळाला सामोरे जात असून यामध्ये हजारो जणांचा बळी गेला आहे. या दुष्काळाने सोमालियातील १३ लाख जण विस्थापित झाले आहेत.

सोमालियाप्रमाणे हॉर्न ऑफ अफ्रिकातील केनिया, युगांडा आणि इथिओपिया या देशांमधील जवळपास २३ लाख जणांना दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागू शकते. मार्च-मे हा या भागातील पावसाळ्याचा मोसम असतो. पण यंदा सामान्याच्या खाली पावसाची अपेक्षा असून यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्याचे इगाडा बजावत आहे.

leave a reply