युरोपिय महासंघ चीनविरोधात बचाव करण्यात सक्षम नाही

- इटलीच्या माजी पंतप्रधानांचा दावा

रोम – चीनने युरोपिय महासंघाच्या एखाद्या सदस्य देशावर हल्ला चढविला तर महासंघ त्याचा बचाव करण्यासाठी सक्षम नाही, असा दावा इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हिओ बर्ल्युस्कोनी यांनी केला. चीनविरोधातील क्षमता मिळविण्यासाठी युरोपिय देशांनी आक्रमक लष्करी धोरण राबवायला हवे तसेच संरक्षणक्षेत्रातील खर्चात मोठी वाढ करणे गरजेचे आहे, असा सल्लाही बर्ल्युस्कोनी यांनी दिला आहे.

युरोपिय महासंघ चीनविरोधात बचाव करण्यात सक्षम नाही - इटलीच्या माजी पंतप्रधानांचा दावागेल्या काही वर्षात चीन व युरोपिय महासंघामधील तणाव सातत्याने वाढत आहे. हाँगकाँग, साऊथ चायना सी, ५जी, तैवान, उघुरवंशियांवरील अत्याचार यासारख्या मुद्यांवर युरोपिय देशांनी उघड भूमिका घेण्यास सुरुवात केल्याने चीनची सत्ताधारी राजवट नाराज आहे. चीनकडून याबाबत वारंवार इशारे दिले जात असतानाही महासंघाने आपल्या धोरणात बदल करण्याचे नाकारले आहे. रशिया-युक्रेन मुद्यावरून दोन बाजूंमधील वाद अधिकच चिघळण्यास सुरुवात झाली असून युरोपने चीनवर निर्बंध लादण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता इटलीच्या माजी पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

हिंदी

 

leave a reply