पुढच्या सात वर्षात देशाची निर्यात दोन ट्रिलियन डॉलर्सवर नेणार

- नव्या ‘एफटीपी’ची घोषणा

नवी दिल्ली – पुढच्या सात वर्षात देशाची निर्यात तब्बल दोन ट्रिलियन डॉलर्सवर (दोन लाख कोटी डॉलर्स) नेण्याचे ध्येय समोर ठेवणाऱ्या ‘फॉरिन ेड पॉलिसी (एफटीपी) 2023’ची घोषणा झाली. केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी हे नवे विदेश व्यापार धोरण जाहीर केले. यामध्ये निर्यात वाढविण्यासाठी उपकारक ठरणाऱ्या उपाययोजनांचा समावेश असून उद्योगक्षेत्रात याचे स्वागत होत आहे. विशेषतः ई-कॉमर्सशी निगडीत निर्यात 2030 सालापर्यंत 200 ते 300 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा या निमित्ताने करण्यात आली.

पुढच्या सात वर्षात देशाची निर्यात दोन लिियन डॉलर्सवर नेणार ट्रिलि - नव्या ‘एफटीपी’ची घोषणादर पाच वर्षांनी नव्या ‘एफटीपी’ची घोषणा केली जाते. याआधीचे व्यापारविषयक धोरण 2015 साली जाहीर करण्यात आले होते. यानंतर 2020 साली नव्या ‘एफटीपी’ची घोषणा अपेक्षित होती. मात्र कोरोनाच्या साथीमुळे आधीचेच धोरण लागू करणे भाग पडले होते. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी नव्या ‘एफटीए’ची घोषणा केली. 1 एप्रिलपासून हे धोरण लागू होणार आहे. मुख्य म्हणजे या धोरणाला काळाची मर्यादा नसेल. त्यामुळे धोरणातील सातत्य कायम राहणार असल्याचे सांगून त्याचा फार मोठा लाभ निर्यातदारांना मिळेल, असा दावा केला जातो.

2022-23च्या वित्तीय वर्षात देशाची निर्यात तब्बल 760 ते 770 अब्ज डॉलर्सवर जाईल. आधीच्या वित्तीय वर्षात ही निर्यात 676 अब्ज डॉलर्स इतकी होती, अशी माहिती केंद्रीय व्यापारमंत्र्यांनी दिली. देशाच्या निर्यातीत अशारितीने वाढ होत असताना याला चालना देणाऱ्या नव्या एफटीपीमुळे 2030 सालापर्यंत निर्यात तब्बल दोन ट्रिलियन डॉलर्सवर जाईल, असा विश्वास पियूष गोयल यांनी व्यक्त केला. या नव्या एफटीपीमध्ये निर्यातदारांना प्रोत्साहनपर सवलती देण्याच्या ऐवजी निर्यातदारांना विविध मार्गाने निर्यातवाढीसाठी लाभ मिळवून देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

याबरोबरच टाऊन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स (टीईई) अर्थात निर्यातीशी निगडीत उद्योगांसाठी निवड करण्यात आलेल्या शहरांमध्ये फरिदाबाद, मुरादाबाद, मिर्झापूर आणि वाराणसी या आणखी चार शहरांचा समावेश करण्यात आला आहे. आधीच्या काळात या यादीत देशातील 39 शहरांचा समावेश होता. याबरोबरच ई-कॉमर्सशी निगडीत असलेल्या उद्योगांची निर्यात 2030 सालापर्यंत 200 ते 300 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे ध्येय या एफटीपीमध्ये ठेवण्यात आले आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रातील निर्यातीबाबत या नव्या धोरणात केलेल्या तरतुदी अतिशय महत्त्वाच्या ठरतील. या क्षेत्रातील भारताची निर्यात आत्ता कुठे सुरू झालेली आहे. या क्षेत्रातील निर्यातीच्या आघाडीवर भारताला फार मोठी संधी आहे आणि त्याचे परिणाम पुढच्या काळात दिसू लागतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

leave a reply