अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे जगभरातील शेअरबाजारांमध्ये पडझड

- जगातील आघाडीची बँक ‘क्रेडिट स्यूस’च्या समभागांमध्ये पाच टक्क्यांपेक्षा अधिक घसरण

वॉशिंग्टन/लंडन/टोकिओ – अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रात आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिलेल्या आश्वासनांनंतरही जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांमध्ये असलेली अनिश्चितता अजून कायम आहे. याचे तीव्र पडसाद अमेरिकेसह जागतिक शेअरबाजारांमध्ये उमटले असून बॅकिंग क्षेत्रातील समभागांना जबरदस्त दणका बसला आहे. एकट्या अमेरिकेत बँकांना जवळपास ९० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले. युरोप व आशियातील बँकांच्या समभागांमध्ये सात ते १३ टक्क्यांची घसरण झाली आहे. अमेरिकेतील आघाडीचे विश्लेषक व माजी फंड मॅनेजर जिम क्रेमर यांनी, देशातील यंत्रणा ॲलर्टवर असल्या तरी बँकिंग क्षेत्रावरील संकट अद्याप टळले नसल्याचा गंभीर इशारा दिला.

अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे जगभरातील शेअरबाजारांमध्ये पडझड - जगातील आघाडीची बँक ‘क्रेडिट स्यूस’च्या समभागांमध्ये पाच टक्क्यांपेक्षा अधिक घसरणगेल्या आठवड्याभरात अमेरिकेतील तीन बँका एकापाठोपाठ एक अपयशी ठरल्या. ‘सिल्व्हरगेट’, ‘एसव्हीबी’ व ‘सिग्नेचर बँक’ अशी या बँकांची नावे असून खातेदार तसेच गुंतवणूकदारांचे २०० अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. या बुडालेल्या बँकांपाठोपाठ अमेरिकेतील अजून किमान ४० बँकांना अर्थसहाय्याची गरज असल्याचे दावे माध्यमे तसेच विश्लेषकांकडून करण्यात येत आहेत. बँकांव्यतिरिक्त अर्थ, वित्त, गुंतवणूक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्याही अडचणीत असल्याचे सांगण्यात येते. बँकिंग क्षेत्रातून सुरू झालेल्या संकटाचे पडसाद या क्षेत्रातही उमटतील, असे मानले जाते.

अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे जगभरातील शेअरबाजारांमध्ये पडझड - जगातील आघाडीची बँक ‘क्रेडिट स्यूस’च्या समभागांमध्ये पाच टक्क्यांपेक्षा अधिक घसरणदरम्यान, अमेरिकेतील संकटाचे गंभीर परिणाम आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये दिसून येत आहेत. अमेरिकेसह युरोप व आशियाई शेअरबाजारांमध्ये पडझडीला सुरुवात झाली. सोमवारी अमेरिकेतील ‘एमएससीआय आशिया पॅसिफिक इंडेक्स’, ‘एस ॲण्ड पी ५००’, व ‘डो जोन्स इंडस्ट्रिअल ॲव्हरेज’ या शेअर निर्देशांकांमध्ये घसरण झाली. अमेरिकेतील ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ या बँकेचे समभाग तब्बल ६० टक्क्यांनी कोसळले. अमेरिकेतील आघाडीच्या बँकांच्या समभागांना जवळपास ९० अब्ज डॉलर्सचा फटका बसल्याची नोंद झाली. युरोपमधील ‘स्टॉक्स बँकिंग इंडेक्स’ ५.७ टक्क्यांनी खाली आला. जगातील १० प्रमुख बँकांपैकी एक असणाऱ्या ‘क्रेडिट स्यूस’ या स्विस बँकेचे समभाग तब्बल ९.६ टक्क्यांनी घसरले. तर जर्मनीतील आघाडीची बँक असणाऱ्या ‘कॉमर्झबँक’च्या समभागांमध्ये १२ टक्क्यांहून अधिक पडझड झाली. अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे जगभरातील शेअरबाजारांमध्ये पडझड - जगातील आघाडीची बँक ‘क्रेडिट स्यूस’च्या समभागांमध्ये पाच टक्क्यांपेक्षा अधिक घसरण‘बर्कलेज्‌‍’ बँकेचे समभाग ५.७ टक्क्यांनी तर ‘युनिक्रेडिट’चे समभाग साडेसात टक्क्यांनी खाली आले. ब्रिटनमधील आघाडीची बँक ‘एचएसबीसी’च्या समभागांमध्येही जवळपास चार टक्क्यांची घसरण झाली.

आशियात जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर व हाँगकाँगमधील शेअरनिर्देशांकांना मोठा फटका बसला. जपानमधील ‘टॉपिक्स बँक्स शेअर इंडेक्स’ ७ टक्क्यांहून अधिक कोसळला. तर ‘निक्केई २२५’ निर्देशांक २.२ टक्क्यांनी खाली आला. जपानमधील आघाडीच्या बँका म्हणून ओळख असणाऱ्या ‘मिझुओ फायनान्शिअल ग्रुप’, ‘एमयुएफजी’ व ‘सुमितोमो मित्सुई फायनान्शिअल ग्रुप’ या बँकांचे समभाग ७ ते १० टक्क्यांनी घसरले. दक्षिण कोरियातील ‘कॉस्पि’ २.६ टक्क्यांनी तर हाँगकाँगचा ‘हँग सेंग’ निर्देशांक २.४ टक्क्यांनी खाली आला.

हिंदी English

 

leave a reply