सोन्याचे दर ५२ हजार प्रति १० ग्रॅमवर पोहोचले

नवी दिल्ली – अमेरिका आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये मोठी उसळी दिसून आली. यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमती नव्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याचे दर १.५ टक्क्यांनी वधारत १० ग्रॅमला ५२१२७ रुपयांवर गेले आहेत. यासह चांदी ३४०० रुपयांनी वाढून प्रती किलो ६४८४९ रुपये झाली आहे. चांदीच्या दराचा हा गेल्या आठ वर्षातील उच्चांक आहे.

Gold-rateअमेरिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये अमेरिकन डॉलर्सचे मूल्य घसरत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात करण्यात आली आहे. डॉलर्समध्ये होत असलेली घसरण आणि अमेरिका चीनमध्ये वाढलेल्या तणावामुळे जागतिक पातळीवर अस्थिर वातावरण निर्माण झाली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीस पसंती देण्यात येत आहे. यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर औंसमागे १९४४ डॉलर्सवर पोहोचले. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. त्यामुळॆ सोमवारी देशातील सोन्याचे दरही वाढून विक्रमी पातळीवर पोहोचले गेले आहेत. सोन्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ दिसून आली.

leave a reply