वेस्ट बँकमधील इस्रायलच्या कारवाईवर हमासचा इशारा

गाझा – पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक भागातील भूभागावर इस्रायलने केलेल्या कारवाईमुळे गाझापट्टीतील हमास ही दहशतवादी संघटना खवळली आहे. पॅलेस्टिनींच्या भूभागाचा इस्रायल घेत असलेला ताबा अजिबात खपवून घेणार नसल्याचा इशारा हमासने दिला. त्याचबरोबर पॅलेस्टिनींनी जेरूसलेममधील अल अक्सा प्रार्थनास्थळाजवळील उपस्थिती वाढवावी, अशी चिथावणी हमासने दिली.

वेस्ट बँकमधील इस्रायलच्या कारवाईवर हमासचा इशाराइस्रायलचे लष्कर वेस्ट बँकमधील जिन्साफूत, अल-फुंदूक आणि हजाह या गावांमधील पॅलेस्टिनींच्या भूभागाचा अवैधरित्या ताबा घेत असल्याचा आरोप हमासने केला आहे. इस्रायलचे लष्कर बळजबरीने पॅलेस्टिनींना हुसकावून लावत येथील भूभागात घुसखोरी करीत असल्याचा ठपका हमासने ठेवला. या गावांमधील जवळपास २१८ ठिकाणांवर इस्रायलचा डोळा असल्याचा दावा हमासने केला. पॅलेस्टिनींच्या भूभागावरील इस्रायलची ही कारवाई आपल्याला मान्य नसल्याचे सांगून हमासने इस्रायलला धमकावले.

दरम्यान, वेस्ट बँकमधील कारवाईवरुन इशारा देणाऱ्या हमासने जेरूसलेममधील प्रार्थनास्थळाजवळ पॅलेस्टिनींनी एकत्र यावे, अशी चिथावणी दिली आहे. यामुळे या भागात इस्रायल आणि पॅलेस्टिनींमध्ये नवा संघर्ष पेट घेऊ शकतो.

हिंदी

 

leave a reply