अमेरिकी मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचे युक्रेनच्या नाटो सदस्यत्वाला समर्थन

सदस्यत्वाला समर्थनडॅव्होस/वॉशिंग्टन – अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी युक्रेनच्या नाटोतील सदस्यत्वाला समर्थन दिले आहे. डॅव्होसमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ला संबोधित करताना किसिंजर यांनी ही भूमिका मांडली. यापूर्वी किसिंजर यांनी युक्रेनने रशियाच्या ताब्यातील भूभागावरील हक्क सोडून द्यावा असा सल्ला दिला होता. यावर युक्रेनमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

‘रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी आपण युक्रेनच्या नाटोतील सदस्यत्वाला विरोध दर्शविला होता. कारण यातून चुकीचा घटनाक्रम सुरू होईल, अशी भीती वाटली होती. मात्र आता संघर्ष अशा स्तराला पोहोचला आहे की, युक्रेनच्या अलिप्त राहण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही. युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देणे हा योग्य निर्णय असेल’, असे हेन्री किसिंजर म्हणाले. त्याचवेळी रशियाबरोबर चर्चेचा मार्ग खुला ठेवणे देखील आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला.

संघर्ष थांबविण्यासाठी रशियाने युक्रेनमधून बाहेर पडायला हवे, असा दावाही किसिंजर यांनी पुढे केला. पाश्चिमात्यांच्या आघाडीमध्ये रशियाचा समावेश महत्त्वाचा असून त्यासाठी या देशालाही संधी द्यायला हवी, असे अमेरिकी मुत्सद्यांनी सुचविले आहे. रशिया-युक्रेन शांतीकरार झाल्यास त्यासाठी अमेरिका व मित्रदेशांच्या आघाडीने हमीदार रहायला हवे, असेही किसिंजर म्हणाले.

हिंदी

leave a reply