अफगाणिस्तानातील अस्थैर्याचा शेजारी देशांना गंभीर धोका

- रशियन परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

गंभीर धोकाताश्कंद – ‘गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकाधिक खालावली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर, अफगाणिस्तानातील अस्थैर्य शेजारी देशांमध्ये पसरण्याचा गंभीर धोका आहे’, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील बेजबाबदार सैन्यमाघारीमुळे या देशातील दहशतवादी हल्ले वाढल्याची टीका याआधी लॅव्हरोव्ह यांनी केली.

उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये आयोजित मध्य आणि दक्षिण आशियाई देशांच्या सुरक्षाविषयक बैठकीत बोलताना, रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणिस्तानातील संघर्षावर जोरदार ताशेरे ओढले. या देशातील संकटामुळे दहशतवाद्यांचा धोका आणि अमली पदार्थांच्या तस्करीची समस्या देखील अधिकच बळावल्याची चिंता परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अफगाणिस्तानातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, रशियाने उझबेकिस्तानमध्ये आपले जवान तैनात केल्याचा दावा केला जातो. शुक्रवारी उझबेक राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमान यांनी अफगाण सीमेजवळील खाल्तोन लष्करी तळाला भेट दिली.

leave a reply