सलग सातव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवरील शस्त्रविक्रीत वाढ

युरोपियन अभ्यासगट ‘सिप्री’चा अहवाल

State-Department-approvesस्टॉकहोम – सलग सातव्या वर्षी संरक्षणक्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या शस्त्रविक्रीत वाढ झाल्याची माहिती ‘सिप्री’ या अभ्यासगटाने दिली. २०२१ साली शस्त्रविक्रीत जवळपास दोन टक्क्यांची वाढ होऊन तो ५९२ अब्ज डॉलर्सवर गेल्याचे ‘सिप्री’च्या अहवालात सांगण्यात Sipriआले. २०१९-२०च्या तुलनेत ही वाढ जास्त असल्याचेही ‘सिप्री’कडून सांगण्यात आले. शस्त्रविक्रीत अमेरिकी कंपन्यांच्या प्रभाव कायम असला तरी चीन व दक्षिण कोरियातील कंपन्यांचा सहभाग सतत वाढत असल्याकडेही अभ्यासगटाने लक्ष वेधले. २०२१ साली संरक्षणक्षेत्रातील १०० आघाडीच्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या शस्त्रविक्रीची आकडेवारी International arms sales rise‘सिप्री’ने सोमवारी जाहीर केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे समोर आले होते. मात्र ही साखळी विस्कळीत असतानाही संरक्षण व शस्त्रास्त्र उद्योगावर त्याचा मोठा परिणाम झाला नसल्याचे २०२१ सालची आकडेवारी दाखविते, याकडेे ‘सिप्री’ने आपल्या अहवालात लक्ष वेधले आहे.

अमेरिकेतील आघाडीच्या ४० कंपन्यांनी जवळपास ३०० अब्ज डॉलर्सची शस्त्रे व इतर संरक्षणसामुग्रीची विक्री केली. शस्त्रविक्री करणाऱ्या कंपन्यांमधील पाच आघाडीच्या कंपन्या अमेरिकी आहेत. तर आघाडीच्या १०० कंपन्यांमधील २७ कंपन्या युरोपातील असल्याचे अभ्यासगटाने म्हटले आहे. युरोपिय कंपन्यांच्या व्यवहारात काही प्रमाणात घट झाली असली तरी फ्रान्सच्या ‘दासॉल्ट ॲव्हिएशन’ने चांगली कामगिरी बजावल्याचे ‘सिप्री’ने म्हटले आहे.

leave a reply