राष्ट्राध्यक्ष बायडेन सत्तेवर आल्यानंतर इराणने अमेरिकेच्या जवानांवर 83 हल्ले चढविले

- अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची कबुली

वॉशिंग्टन – ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यापासून गेल्या दोन वर्षात इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी अमेरिकेच्या जवानांवर तब्बल 83 वेळा हल्ले चढविले आहेत. याविरोधात अमेरिकेने इराणला फक्त चार वेळाच प्रत्युत्तर दिले, अशी जाहीर कबुली अमेरिकेच संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिली. त्यामुळे बायडेन प्रशासन इराणच्या विरोधात गुळमुळीत भूमिका स्वीकारीत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना बळ मिळत आहे. असे असले तरी बायडेन प्रशासन इराणविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारण्यास तयार नसल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते.

राष्ट्राध्यक्ष बायडेन सत्तेवर आल्यानंतर इराणने अमेरिकेच्या जवानांवर 83 हल्ले चढविले - अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची कबुलीअमेरिकन सिनेटच्या आर्म्ड्‌‍ सर्व्हिसेस कमिटीचे अध्यक्ष टॉम कॉटन यांच्यासमोरच्या चौकशीत बोलताना संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी अमेरिकी जवानांवरील इराणचे हल्ले वाढल्याचे मान्य केले. इराक आणि सिरियातील इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी अमेरिकी जवानांवर 83 वेळा हल्ले चढविले. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या 26 महिन्यात झालेल्या या हल्ल्यांमध्ये अमेरिकेची जीवितहानी झालेली नाही. पण इराणच्या या हल्ल्यांना बायडेन प्रशासनाने प्रत्युत्तरही दिलेले नाही, हे ऑस्टिन यांनी कबुल केले. तसेच चार वेळा दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये इराणचे फारसे नुकसान झाले नसल्याचेही ऑस्टिन म्हणाले.

अमेरिकी जवानांचा बळी जात नाही, तोपर्यंत आपण इराणला उत्तर देणार नाही का? असा परखड सवाल सिनेटर कॉटन यांनी केला. राष्ट्राध्यक्ष बायडेन सत्तेवर आल्यानंतर इराणने अमेरिकेच्या जवानांवर 83 हल्ले चढविले - अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची कबुलीबायडेन प्रशासनाच्या या भूमिकेमुळेच बेफिकीर बनलेल्या इराणकडून अमेरिकी जवानांवरील हल्ले वाढले आहेत, याकडे कॉटन यांनी लक्ष वेधले. बायडेन प्रशासनाच्या आधी इराण व इराणसंलग्न दहशतवाद्यांनी अमेरिकी जवानांवर कितीवेळा हल्ले चढविले, याचे तपशीलही संरक्षणमंत्री ऑस्टिन किंवा सेंटकॉमकडे नसल्याची गंभीर बाब यावेळी उघड झाली. यावरुन अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय इराणबाबत अधिकच ढिले धोरण स्वीकारत असल्याचा शेरा कॉटन यांनी मारला.

दरम्यान, बायडेन प्रशासनाने इराणबाबत दाखविलेल्या या भूमिकेवर अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी तसेच लष्करी विश्लेषक टीका करीत आहेत. 26 महिन्यांमध्ये 83 हल्ले म्हणजे इराण एका महिन्यात अमेरिकी जवानांना तीन वेळा लक्ष्य करीत आहे. यामुळे इराक-सिरियातील अमेरिकी जवानांच्या सुरक्षेला असलेला धोका वाढल्याचा दावा हे निवृत्त लष्करी अधिकारी व विश्लेषक करीत आहेत.

leave a reply