इराण-सौदी सहकार्यामुळे इस्रायल व आखाती देशांमधील संबंध बिघडणार नाही

- बाहरिनमधील इस्रायली राजदूतांचा विश्वास

मनामा – इराण आणि सौदी अरेबियातील सहकार्यामुळे इस्रायल व आखाती देशांमधील सहकार्य संपुष्टात येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण हे अतिशयोक्तीपूर्ण दावे असून इराण-सौदी सहकार्याचा इस्रायल व आखाती देशांमधील संबंधांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, असा विश्वास बाहरिनमधील इस्रायलचे राजदूत एतान नाएह यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर चीनच्या मध्यस्थीने पार पडलेल्या इराण व सौदी अरेबियातील चर्चेतून पुढे काय निष्पन्न होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, असेही नाएह यांनी स्पष्ट केले.

इराण-सौदी सहकार्यामुळे इस्रायल व आखाती देशांमधील संबंध बिघडणार नाही - बाहरिनमधील इस्रायली राजदूतांचा विश्वासइस्रायल व बाहरिनमधील व्यापार वाढविण्यासाठी राजधानी मनामा येथे ‘कनेक्ट२इनोव्हेट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाहरिनचे ५३० तर इस्रायलचे ६० उद्योजक सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर इस्रायल व बाहरिनचे मंत्री, नेते आणि अधिकारी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी चीनच्या मध्यस्थीने इराण व सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या चर्चेनंतर बाहरिनमध्ये सदर बैठक यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली, याकडे इस्रायलचे राजदूत एतान नाएह यांनी लक्ष वेधले.

इराण व सौदीमधील चर्चेनंतर भविष्यात काय होईल, ते आत्ताच सांगता येणार नाही. पण या बैठकीनंतर इस्रायल व आखाती देशांमधील संबंध संपुष्टात यायचे असते तर बाहरिनमधील ही बैठक पार पडलीच नसती, असा दावा नाएह यांनी केला. इराण-सौदीमधील या चर्चेबाबत आखाती देशांमध्ये उत्सुकता असल्याची कबुली नाएह यांनी दिली. पण त्याचबरोबर इराण व सौदीमधील संबंध काही २०१६ सालच्या घटनेनंतर बिघडलेले नाहीत, याकडे दोन्ही देशांमधील वादाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे, याकडे नाएह यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर चीनच्या मध्यस्थीने पार पडलेल्या इराण-सौदीमधील सहकार्यासाठी इस्रायलच्या राजदूतांनी रशियन दंतकथेतील विंचू आणि बेडकाचे उदाहरण दिले. या कथेनुसार, विंचवाला नदी पार करायची असते. बेडकाने आपल्याला स्वत:च्या पाठीवर ठेवून नदी पार करण्यासाठी सहाय्य करावे, यासाठी विंचू बेडकाची समजूत काढतो. विंचू नांगी मारेल, या भीतीने बेडूक नकार देतो. पण विंचवाने गयावया केल्यानंतर बेडूक त्याला पाठीवर घेऊन नदी पार करण्यास सुरुवात करतो.इराण-सौदी सहकार्यामुळे इस्रायल व आखाती देशांमधील संबंध बिघडणार नाही - बाहरिनमधील इस्रायली राजदूतांचा विश्वास मात्र अर्ध्यावर जाताच विंचू सवयीप्रमाणे बेडकाला नांगी मारतो, ही रशियन दंतकथा नाएह यांनी पत्रकारांना सांगितली. त्याचबरोबर या कथेतील विंचू आणि बेडूक कोण, हे वेगळे सांगायला नको, असा टोला इस्रायली राजदूतांनी लगावला.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी चीनच्या मध्यस्थीने इराण व सौदीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा पार पडल्याचा दावा केला जातो. येत्या काळात इराण व सौदीमध्ये राजनैतिक स्तरावर सहकार्य प्रस्थापित होईल, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करू लागले आहेत. तसेच सौदीपाठोपाठ युएई, बाहरिन व इतर अरब देश देखील इराणबरोबर सहकार्य करतील, अशा बातम्या येत आहेत. असे असले तरी येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोर संघटनेने जाहीररित्या सौदी समर्थक हादी सरकारवरील हल्ले थांबणार नसल्याचे बजावले आहे. तसेच सौदीच्या सीमेवरील हल्ल्यांची शक्यताही हौथींनी फेटाळलेली नाही. त्यामुळे बाहरिनमधील इस्रायलच्या राजदूतांनी रशियन दंतकथेचे उदाहरणासह आखाती देशांना इशारा दिल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply