इस्रायली बनावटीची आयर्न डोम यंत्रणेची युक्रेनमध्ये तैनाती होऊ शकते

- अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

वॉशिंग्टन – मागणी आलीच तर इस्रायली बनावटीची ‘आयर्न डोम’ हवाई सुरक्षा यंत्रणा युक्रेनमध्ये तैनात करता येईल, असे अमेरिकेचे लेफ्टनंट जनरल डॅनिअल कारर्ब्लेर यांनी म्हटले आहे. अमेरिकन सिनेटच्या ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’समोर झालेल्या सुनावणीत सिनेटर अँगस किंग यांनी ही हवाई सुरक्षा यंत्रणा युक्रेनमध्ये तैनात का केली जात नाही, असा सवाल केला होता. त्यावर लेफ्टनंट जनरल कारर्ब्लेर यांनी हा दावा केला. युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाबरोबर इस्रायलचे संबंध राखून असल्याची टीका युक्रेनने नुकतीच केली होती. त्यानंतर इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेची तैनाती युक्रेनमध्ये करण्याबाबत अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केलेली ही विधाने लक्षवेधी ठरतात.

इस्रायली बनावटीची आयर्न डोम यंत्रणेची युक्रेनमध्ये तैनाती होऊ शकते - अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावापॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या रॉकेट्स व मॉर्टर्सच्या माऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी इस्रायलने आयर्न डोम यंत्रणा विकसित केली. ही हवाई सुरक्षा यंत्रणा अतिशय प्रभावी असून यामुळे इस्रायलवरील रॉकेट्चे हल्ले निष्प्रभ ठरले आहेत. गाझातील इस्लामिक जिहाद या संघटनेने गेल्या पाच दिवसांपासून इस्रायलवर चढविलेले रॉकेट्स व मॉर्टर्सचे हल्ले या यंत्रणेने मोठ्या प्रमाणात भेदले होते. अशारितीने इस्रायलच्या सुरक्षेत अतिशय महत्त्वाचे योगदान देणारी ही हवाई सुरक्षा २०११ साली इस्रायलने विकसित केली होती. या प्रकल्पाला अमेरिकेने सुमारे २.६ अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य पुरविले होते.

अमेरिकेने या हवाई सुरक्षा यंत्रणेसाठी इतकी मोठी गुंतवणूक केलेली असताना, ही अतिशय प्रभावी यंत्रणा युक्रेनच्या बचावासाठी का वापरली जात नाही, असा सवाल अमेरिकेचे सिनेटर अँगस किंग यांनी केला होता. आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीच्या सुनावणीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून रशियाच्या हल्ल्यापासून युक्रेनचे संरक्षण करण्यात अमेरिकेला स्वारस्य नाही का, असा प्रश्न केला. याला लेफ्टनंट जनरल डॅनिअल कारर्ब्लेर यांनी उत्तर दिले. अमेरिकन संरक्षणदलांकडे आयर्न डोमच्या दोन बॅटरीज्‌‍ आहेत. मागणी आल्यानंतर यातील एक बॅटरी युक्रेनमध्ये तैनात केली जाऊ शकते, असे लेफ्टनंट जनरल कारर्ब्लेर म्हणाले.

इस्रायली बनावटीची आयर्न डोम यंत्रणेची युक्रेनमध्ये तैनाती होऊ शकते - अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावायुक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलने युक्रेनला अपेक्षित सहकार्य केले नाही, अशी तक्रार या देशाकडून करण्यात येत होती. इस्रायलमधील निवडणुकीत बेंजामिन नेत्यान्याहू यांना यश मिळाले व ते पंतप्रधानपदावर आल्यानंतर युक्रेनला इस्रायलकडून सहाय्य मिळण्याची शक्यता निकालात निघाल्याचे दावे काहीजणांनी केले होते. पंतप्रधान नेत्यान्याहू यांचे रशियाशी चांगले संबंध असल्याने युक्रेनला लष्करी सहाय्य पुरवून हे सहकार्य धोक्यात टाकण्याची जोखीम इस्रायल पत्करणार नाही, असा तर्क त्यामागे होता.

सोमवारी युक्रेनच्या सरकारने इस्रायल अजूनही रशियाशी उत्तम संबंध राखून असल्याचे सांगून त्यावर टीका केली होती. इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रशियाला भेट दिली होती. त्यानंतर युक्रेनची ही प्रतिक्रिया आली होती. या पार्श्वभूमीवर, सध्या अमेरिकेकडे असलेल्या इस्रायली बनावटीच्या आयर्न डोमची युक्रेनमधील तैनाती लक्षवेधी बाब ठरू शकते.

हिंदी

 

leave a reply