पाकिस्तानला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायलच्या मोसादने हालचाली केल्या होत्या

- स्वित्झर्लंडच्या दैनिकाचा दावा

बर्न – ‘पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज होऊ नये, यासाठी इस्रायलची प्रख्यात गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद`ने 1980च्या दशकात प्रयत्न केले होते. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला सहाय्य करणाऱ्या जर्मन व स्विस कंपन्यांमध्ये मोसादने स्फोट घडविले होते`, असा दावा स्वित्झर्लंडच्या दैनिकाने केला. त्याचबरोबर इराणला अणुकार्यक्रमात सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाचे जनक ए. क्यू. खान यांनी चार दशकांपूर्वी प्रयत्न केले होते, असेही सदर दैनिकाने म्हटले आहे.

पाकिस्तानला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायलच्या मोसादने हालचाली केल्या होत्या - स्वित्झर्लंडच्या दैनिकाचा दावास्वित्झर्लंडच्या ‘नेयू झर्चर झिट्यूंग-एनझेडझेड` या दैनिकाने ही बातमी प्रसिद्ध केली. 1980च्या दशकात जर्मन आणि स्विस संशयित तसेच कंपन्या पाकिस्तानला अण्वस्त्रसज्जतेसाठी आवश्‍यक तंत्रज्ञान व साहित्य पुरविणार होत्या. तसे झाले तर पाकिस्तान हा अणुबॉम्ब असणारा पहिला इस्लामी देश ठरेल व तो आपल्या सुरक्षेसाठी धोका ठरेल, अशीभीती इस्रायलला सतावित होती, असे या दैनिकाने म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादने जर्मन व स्विस कंपन्यांमध्ये स्फोट घडविले होते.

मोसादच्या संशयित हस्तकांनी केलेल्या घातपातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. स्वित्झर्लंडमधील विश्‍लेषक एड्रियन हॅनी यांनी यामागे मोसाद असल्याचा दावा केला होता. पाकिस्तानला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायलच्या मोसादने हालचाली केल्या होत्या - स्वित्झर्लंडच्या दैनिकाचा दावापण तसे कुठलेही धागेदोरे किंवा पुरावे सापडलेले नाहीत, हे देखील सदर दैनिकाने आपल्या बातमीत म्हटले आहे. मात्र या स्फोटांमुळे पाकिस्तानला सहाय्य करणाऱ्या जर्मन व स्विस कंपन्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती, असा दावा एनझेडझेडने केला.

या स्फोटापूर्वी पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान आणि इराणच्या अणुकार्यक्रमाचे प्रमुख मसूद नाराघी यांची स्वित्झर्लंडच्या झ्युरिक येथीला हॉटेलमध्ये भेट झाली होती, याकडे सदर दैनिकाने लक्ष वेधले. इस्रायली माध्यमांनी ही बातमी उचलून धरली आहे. पण इस्रायलच्या सरकारी यंत्रणांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. इराणच्या अणुकरारावर व्हिएन्ना येथे वाटाघाटी सुरू आहेत. तर तालिबानच्या अफगाणिस्तानावरील ताब्यामुळे उत्साह वाढलेले दहशतवादी अण्वस्त्रधारी पाकिस्तान कब्जात घेण्याची भाषा करी आहेत. अशा काळात समोर आलेली ही बातमी औचित्यपूर्ण ठरते.

leave a reply