जॉर्डन इराणशी सहकार्य प्रस्थापित करण्याच्या तयारीत

अम्मान – सौदी अरेबिया आणि युएईनंतर जॉर्डनने देखील इराणशी नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलली आहेत. दोन दिवसांपूर्वीच इराण आणि जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये या संदर्भात चर्चा पार पडली. लवकरच दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक पार पडणार असल्याचा दावा केला जातो.

cooperation with Iranमहिन्याभरापूर्वी चीनने इराण आणि सौदी अरेबियामध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी केल्यानंतर आखातातील इतर अरब देश इराणबरोबर सहकार्यासाठी पुढाकार घेत आहेत. इराण आणि जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये फोनवरून पार पडलेली चर्चा देखील त्याचाच एक भाग ठरतो. या सहकार्याला आकार देण्यासाठी लवकरच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये भेट होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

जॉर्डन हा इस्रायलचा शेजारी देश आहे. याआधीच पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून इस्रायल आणि जॉर्डनमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत इराण व जॉर्डन मधील सहकार्य इस्रायलसाठी डोकेदुखी ठरू शकते.

leave a reply