चीनची युक्रेन युद्धासंदर्भातील भूमिका बदलण्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अपयशी

- अमेरिका व युक्रेनमधील माध्यमांचा दावा

बीजिंग/मॉस्को – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्यावर चीनला इशारा दिल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन चीनच्या राजवटीला युक्रेन संघर्षाबाबत असलेली भूमिका बदलण्यासाठी राजी करतील, असे संकेत देण्यात आले होते. मात्र फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना त्यात यश मिळाले नसल्याचा दावा अमेरिका व युक्रेनमधील माध्यमांनी केला आहे. उलट मॅक्रॉन दौऱ्यावर असतानाचा चीनच्या प्रवक्त्यांनी युक्रेन युद्धासाठी नाटोच जबाबदार असल्याचा ठपका ठेऊन पाश्चिमात्यांनी चीनला लेक्चर देऊ नये, असे सुनावले आहे.

चीनची युक्रेन युद्धासंदर्भातील भूमिका बदलण्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अपयशी - अमेरिका व युक्रेनमधील माध्यमांचा दावारशिया-युक्रेन संघर्षात युक्रेनच्या पाठिशी उभे राहिलेले पाश्चिमात्य देश जगातील इतर देशांनाही रशियाविरोधात जाण्यास भाग पाडत आहेत. मात्र या दबावतंत्राकडे चीन, भारत यासह आखात, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील आघाडीच्या देशांनी दुर्लक्ष केले आहे. युरोप व चीनमध्ये व्यापक आर्थिक तसेच व्यापारी संबंध असल्याने युरोपिय देशांना चीनवर दडपण आणणे कठीण जात आहे. मात्र तरीही गेल्या काही महिन्यात जर्मनी, स्पेन व फ्रान्स यासारख्या आघाडीच्या देशांनी चीनचा दौरा करीत त्याच्या भूमिकेत बदल घडविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

मात्र रशियाशी आर्थिक, व्यापारी व सामरिकदृष्ट्या जवळिकीचे संबंध प्रस्थापित केलेल्या चीनने रशियाबरोबरील सहकार्यात बिघाडी करण्याचे नाकारले आहे. उलट पाश्चिमात्य देशांसह जगासमोर रशिया-युक्रेन संघर्षबंदीसाठी प्रयत्न करणारा देश म्हणून चित्र उभे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. चीनची युक्रेन युद्धासंदर्भातील भूमिका बदलण्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अपयशी - अमेरिका व युक्रेनमधील माध्यमांचा दावात्यासाठी चीनने एक शांतीप्रस्तावही समोर आणला असून पाश्चिमात्य देशांनी तो स्वीकारावा अशी आग्रही भूमिका चीनने घेतली आहे. पण अमेरिका व युरोपिय देशांनी त्याला दाद दिलेली नाही.

या पार्श्वभूमीवर मॅक्रॉन यांच्या दौऱ्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष होते. पण चीनने फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या आवाहनालाही प्रतिसाद दिला नसल्याचे माध्यमांनी दिलेल्या वृत्तावरून स्पष्ट होते. उलट हा दौरा सुरु असतानाच चीनच्या परराष्ट्र प्रवक्ता माओ निंग यांनी, युक्रेनच्या मुद्यावरून पाश्चिमात्य देशांविरोधात आगपाखड केली. युक्रेनमधील समस्येसाठी अमेरिका व नाटोची लष्करी आघाडीच जबाबदार असल्याचा ठपका निंग यांनी ठेवला. तर चीनच्या रशियातील राजदूतांनी युक्रेनच्या विषयावर आम्हाला सूचना करण्याचा अधिकार पाश्चिमात्य देशांना नसल्याचे बजावले.

leave a reply