कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणावर नोकर्‍या गेल्या – ‘एफआयएस’चा अहवाल

नवी दिल्ली – कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत नोकर्‍या अधिक प्रमाणात गेल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. यामध्ये ५५ वर्षांवरील आणि २४ खालील कर्मचार्‍यांच्या नोकर्‍यांवर सर्वाधिक परिणाम झाला. काही दिवसांपूर्वीच दुसर्‍या लाटेमुळे मे महिन्यात १ कोटी जणांचे रोजगार गेल्याचा अंदाज ‘द सेंटर फॉर मोनिटरिंग इंडियन इकोनॉमी’ने व्यक्त केला होता. तसेच यामुळे बेरोजगारी १२ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर नवा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

नोकर्‍याफॉर्च्युन५०० कंपन्यांमध्ये एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणावर नोकर्‍या गेल्याचे म्हटले आहे. फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपनी एफआयएसकडून हे सर्व्हे करण्यात आला. यानुसार २४ वर्षांखालील ११ टक्के जणांनी दुसर्‍या लाटेत आपल्या नोकर्‍या किंवा रोजगार गमावले. गेल्यावर्षी पहिल्या लाटेत हे प्रमाण १० टक्के होते. तेच ५५ वर्षांवरील ६ टक्के जणांनी आपल्या नोकर्‍या कायमस्वरूपी गमावल्या. गेल्यावर्षी हेच प्रमाण चार टक्के होते.

सर्वेक्षणानुसार सर्वच वयोगटातील कामगारांच्या नोकर्‍या गेल्या आहेत व हे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. अस्थायी नोकर्‍या गमावणार्‍यांचे प्रमाणही अधिक आहे. १८ ते २४ वयोगटातील ९ टक्के जणांना कामावरून अस्थायी स्वरुपात काढून टाकण्यात आले. तर ५५ वषार्र्ंवरील ७ टक्के जणांना अस्थायी नोकर कपातीचा सामना करावा लागला.

तसेच वर्षभरात आर्थिक फसवणुकीचे प्रकारही वाढल्याचे सर्वेक्षणात लक्षात आले आहे. १८ ते २४ वयोगटातील ३८ टक्के जणांची फसवणूक झाल्याचा निष्कर्ष अहवालात समोर आला आहे. तर २५ ते २९ वयोगटातील ४१ टक्के जणांनी आर्थिक फसवणुकीचा अनुभव घेतला. खोटे कॉल, क्यूआर कोड, युपीआय स्कॅम, तसेच काही ग्राहक कार्ड स्किमिंगचे बळी ठरले.

भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार्‍या ‘द सेंटर फॉर मोनिटरिंग इंडियन इकोनॉमी’ (सीएमआयई) या संस्थेने मे महिन्यातच १ कोटी जणांचे रोजगार गेल्याचे म्हटले होते. यामुळे बेरोजगारी दर १२ महिन्याच्या उच्च पातळीवर पोहोचल्याचा दावा सीएमआयईने केला होता.

leave a reply