‘वुहान व्हायरस’चा पर्दाफाश करणार्‍या चिनी संशोधिकेच्या आईला चीनमध्ये अटक

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसचे सत्य जगासमोर मांडणार्‍या पत्रकार, लेखक, संशोधक, डॉक्टरांवर किंवा त्यांच्या नातेवाईकांवर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून कारवाई केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या विषाणूची निर्मिती चीनच्या लष्कर नियंत्रित वुहानच्या प्रयोगशाळेतच झाली व याचे पुरावे असल्याचे जगजाहीर करणार्‍या चिनी संशोधिका डॉक्टर ली-मेंग यान यांच्या आईला चीनमध्ये अटक करण्यात आली आहे. डॉक्टर ली ह्यांनी सध्या अमेरिकेत आश्रय घेतला असून लवकरच त्या कोरोनाबाबतचे पुरावे जगासमोर उघड करणार होत्या. पण त्याआधी चीनच्या राजवटीने त्यांच्या कुटूंबावर कारवाई करुन डॉक्टर ली यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्‍न केल्याचे दिसत आहे.

‘वुहान व्हायरस’चा पर्दाफाश करणार्‍या चिनी संशोधिकेच्या आईला चीनमध्ये अटकहाँगकाँगच्या सरकारी रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टर ली-मेंग यान यांनी एप्रिल महिन्यात पलायन करुन अमेरिकेत आश्रय घेतला होता. अमेरिकेत दाखल झाल्यानंतर डॉक्टर ली यांनी कोरोनाव्हायरस हा नैसर्गिक विषाणू नसून मानवनिर्मित असल्याचा गौप्यस्फोट केला होता. चीनने हेतूपूरस्सर या विषाणूची निर्मिती करुन त्याचा फैलाव केल्याचा आरोप डॉक्टर ली यांनी केला. चीनने या विषाणूची निर्मिती कशी केली, याचे पुरावे आपल्याकडे असून लवकरच ते जगासमोर मांडण्यात येतील, असे डॉक्टर ली यांनी गेल्या महिन्यात अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना जाहीर केले होते. त्याचबरोबर चीनची राजवट आणि त्यांचे पाठीराखे हे सत्य उघड होऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्‍न करीत असल्याचा आरोप डॉक्टर ली यांनी केला होता.

‘वुहान व्हायरस’चा पर्दाफाश करणार्‍या चिनी संशोधिकेच्या आईला चीनमध्ये अटकडॉक्टर ली यांच्या या खळबळजनक माहितीनंतर सोशल मीडियावरील त्यांचे अकाऊंट बंद करण्यात आले होते. तसेच त्यांची ही मुलाखत लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्‍नही झाले होते. तर डॉक्टर ली यांनी कोरोनाबाबत मांडलेले संशोधन काही शास्त्रज्ञांनी फेटाळले होते. तर काही संशोधकांनी सदर संशोधन पडताळून पाहण्याचेही नाकारले होते. मात्र सोशल मीडियामध्ये डॉक्टर ली यांच्या संशोधनला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती. तसेच चीनमुळेच कोरोनाव्हायरस जगभरात पसरल्याची टीका अधिक जोर पकडू लागली होती. आतापर्यंत चीनच्या राजवटीला आव्हान देणार्‍यांप्रमाणे डॉक्टर ली किंवा त्यांच्या कुटूंबियांवरही कारवाई केली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

ही भीती खरी ठरली असून चीनच्या लष्कराने डॉक्टर ली यांच्या आईला ताब्यात घेतल्याची माहिती उघड झाली आहे. डॉक्टर ली यांनी देखील अमेरिकास्थित ‘द इपोक टाईम्स’ या वर्तमानपत्राशी बोलताना आपल्या आईला अटक झाल्याची माहिती दिली. असे पहिल्यांदा घडले नसून गेल्या काही महिन्यांमध्ये चिनी सुरक्षायंत्रणांनी डॉक्टर ली यांच्या आईला किमान तीन वेळा अटक करुन त्यांचा मानसिक छळ केल्याचा दावा केला जातो. कोरोनाव्हायरसच्या साथीबाबतची चीनला अडचणीत टाकणारी संवेदनशील माहिती जगासमोर येऊ नये, यासाठी आधीही चीनने बर्‍याच जणांची मुस्काटदाबी केली होती. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध करुन चीनचे पितळ उघडे पाडले होते. यामुळे जगभरातील जनता चीनचा तिरस्कार करू लागली आहे.

leave a reply