उत्तर कोरियाने अमेरिकेशी संघर्षाची तयारी ठेवावी

- हुकूमशहा किम जॉंग उन

सेऊल – ‘अमेरिकेतील बायडेन प्रशासनाशी चर्चा आणि संघर्ष, अशी दोन्हीची तयारी ठेवावी. विशेषत: उत्तर कोरियाच्या प्रतिष्ठेची सुरक्षा आणि विकासासाठी अमेरिकेबरोबरच्या संघर्षासाठी सज्जता वाढविणे भाग आहे’, असे आदेश उत्तर कोरियन हुकूमशहा किम जॉंग-उन यांनी दिले. याच्या आधी उत्तर कोरियाच्या हुकूमशाहांनी थेट अमेरिकेवरच अणुहल्ला चढविण्याची धमकी दिली होती. यानंतर दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाविरोधात ऍक्शन घेण्याची वेळ आल्याचे बजावले होते.

उत्तर कोरियाने अमेरिकेशी संघर्षाची तयारी ठेवावी - हुकूमशहा किम जॉंग उनउत्तर कोरियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हुकूमशहा किम जॉंग-उन यांनी गुरुवारी देशातील कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्तर कोरियन हुकूमशहाने येत्या काळात अमेरिकेच्या विरोधातील आपले धोरण उघड केले, अशी माहिती उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी उत्तर कोरियाने तयारी करावी, अशी सूचना किम जॉंग-उन यांनी दिली. मात्र चर्चेची तयारी करीत असताना अमेरिकेबरोबरच्या संघर्षासाठी सज्जता ठेवा, असे आदेश देखील उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने आपल्या लष्करी अधिकार्‍यांना दिले आहेत.उत्तर कोरियाने अमेरिकेशी संघर्षाची तयारी ठेवावी - हुकूमशहा किम जॉंग उन

याआधी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने अमेरिकेवर अणुहल्ला चढविण्याची धमकी दिली होती. यानंतर बायडेन प्रशासनाने उत्तर कोरियापासून अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचे बजावले होते. त्यावर आक्षेप घेऊन उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अमेरिकेच्या अतिपूर्वेकडील शहरांवर हल्ले चढविण्याची धमकी दिली आणि याच्यासह उत्तर कोरियाने नव्या अणुचाचणीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या.

उत्तर कोरियाने अमेरिकेशी संघर्षाची तयारी ठेवावी - हुकूमशहा किम जॉंग उनउत्तर कोरियाच्या या धमक्या अमेरिकेने गांभीर्याने घ्याव्या, असे आवाहन दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी केले होते. आण्विक व क्षेपणास्त्र कार्यक्रम राबविणार्‍या उत्तर कोरियावर ऍक्शन घेण्याची हीच वेळ आहे, असा इशारा राष्ट्राध्यक्ष मून यांनी अमेरिकेला दिला होता. जपानने देखील उत्तर कोरियापासून आपल्या सुरक्षेला धोका असल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, उत्तर कोरियाकडून दखल घेण्यासारख्या लष्करी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. काही आठवड्यांपूर्वी उत्तर कोरियन हुकूमशहाने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संपर्क केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे कोरोनाची साथ व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कारवायांमुळे दडपणाखाली आलेला चीन आता उत्तर कोरियाचा वापर करून पाश्‍चिमात्यांना वेठीस धरत असल्याचे संकेत मिळत आहेत. याआधीही चीनने आपले सामरिक हेतू साधण्यासाठी उत्तर कोरियाचा वापर केला होता.

leave a reply