परदेशातील भारतीयांनी ८७ अब्ज डॉलर्स भारतात धाडले

- जगात सर्वाधिक रेमिटन्स भारतात

नवी दिल्ली – यावर्षात भारताला परदेशस्थ भारतीयांनी पाठविल्या निधीत मोठी वाढ झाली आहे. परदेशात राहणार्‍या भारतीयांकडून येणारा रेमिटन्स अर्थात पाठवलेला निधी ८७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज जागतिक बँकेने वर्तविला आहे. भारत जगातील सर्वाधिक रेमिटन्स मिळविणार देश ठरला असून भारताला परदेशस्थ भारतीयांकडून मिळालेला सर्वाधिक निधी हा अमेरिकेतून आला असल्याचेही जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

परदेशातील भारतीयांनी ८७ अब्ज डॉलर्स भारतात धाडले - जगात सर्वाधिक रेमिटन्स भारतातविविध देशांना आपल्या परदेशात राहणार्‍या नागरिकांकडून मिळणार्‍या निधीबाबतचा अहवाल जागतिक बँकेने बुधवारी प्रसिद्ध केला. या अहवालात भारत जागतील सर्वात रेमिटन्स मिळविणारा देश ठरल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. भारताला आपल्या परदेशस्थ नागरिकांकडून मिळणार्‍य निधी याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ४.६ टक्क्यांनी वाढला आहे. हा रेमिटन्स ८७ अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल असा अंदाज आहे. कोरोनाकाळात परेदशात राहणार्‍या भारतीयांनी भरपूर सारा निधी मदतीच्या रुपात भारतात पाठविला. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत भारतात आढळत असलेल्या रुग्णांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली. तसेच सर्वाधिक मृत्यूंची नोंदही भारतात होत होती. अशावेळी परेदशस्थ भारतीयांकडून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ भारतात सुरू झाला, असे जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

इतकेच नाही तर २०२२ सालातही भारताला मिळणार्‍या रेमिटन्समध्ये वाढ होईल, असा अंदाज वर्ल्ड बँकेने व्यक्त केला आहे. पुढील वर्षी भारताचा रेमिटन्स ८९.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचेल, अशी शक्यता जागतिक बँकेने व्यक्त केली आहे. भारतापाठोपाठ सर्वाधिक रेमिटन्स हा चीन, मेक्सिको आणि फिलिपाईन्सला मिळाला आहे. मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या रेमिटन्समध्ये ७.३ टक्क्यांची वाढ होऊन हा रेमिटन्स ५८९ अब्ज डॉलर्सवर जाण्याची शक्यताही जागतिक बँकेने वर्तविरली आहे. गेल्यावर्षी परदेशस्थ भारतीयांनी ८३ अब्ज डॉलर्स भारतात पाठविले होते. २०२० सालातही भारतच सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश ठरला होता. तर चीनला ६० अब्ज डॉलर्सचा रेमिटन्स मिळाला होता.

कोणत्याही देशासाठी त्यांच्या परदेशस्थ नागरिकांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. भारतात येणार्‍या रेमिटन्समधून अनेक विकासाची कामे पुर्ण केली जातात. गरीबांसाठी योजना राबविण्यासाठीही हा निधी महत्त्वाचा ठरत असतो. तसेच परकीय गंगाजळीत वाढ असल्याने चलन मूल्य स्थिर ठेवण्यास किंवा अधिक मजबूत करण्यात रेमिटन्सची महत्त्वाची भूमीका असते. सकल राष्ट्रीय उत्पान्नावर (जीडीपी) याचा मोठा परिणाम दिसत असतो. त्यामुळे देशातील वाढता रेमिटन्स अतिशय महत्त्वाची बाब ठरते.

leave a reply