भविष्यात अमेरिकेतील राजकीय हिंसाचार अधिकच वाढेल

- ‘सीबीएस- यु गव्ह’च्या अहवालातील इशारा

राजकीय हिंसाचारवॉशिंग्टन – अमेरिकन संसदेच्या मध्यावधी निवडणुका जवळ येत असतानाच राजकीय हिंसाचाराची तीव्रता अधिकाधिक वाढण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेतील आघाडीची वृत्तवाहिनी ‘सीबीएस’ व ‘यु गव्ह’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली. येणाऱ्या काळात अमेरिकेतील राजकीय हिंसाचार वाढेल असे मत ६० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक लोकशाही धोक्यात आणत असल्याचे वक्तव्य करून त्यांची ‘एक्स्ीमिस्ट’ अर्थात अतिरेकी अशी संभावना केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना माजी राष्ट्राध्यक्ष म्प यांनी बायडेन हे ‘एनिमी ऑफ द स्टेट’ अर्थात देशाचे शत्रू असल्याचे टीकास्त्र सोडले होते. या पार्श्वभूमीवर वाढत्या हिंसाचाराची शक्यता वर्तविणारा अहवाल लक्ष वेधून घेणारा ठरतो.

राजकीय हिंसाचारची प्रसारमाध्यमे, अभ्यासगट, विश्लेषक तसेच माजी लष्करी अधिकारीही देशात तीव्र होत असलेले राजकीय धु्रवीकरण व त्यातून होणारा संघर्ष आणि हिंसाचाराच्या मुद्याकडे सातत्याने लक्ष वेधत आहेत. ‘ब्लॅक लाईव्हज्‌‍ मॅटर’ या गटाने घडविलेली हिंसा, २०२० सालच्या अखेरीस झालेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक , त्याचा निकाल आणि ६ जानेवारी, २०२१रोजी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घडविलेला हिंसाचार हे मुद्दे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेतील सध्याचे बायडेन प्रशासन ध्रुवीकरण तसेच मतभेद कमी करण्यात अपयशी ठरले आहे. उलट राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची धोरणे व निर्णयांमुळे अमेरिकी जनतेतील असंतोष अधिक तीव्र बनला आहे.

गेल्याच महिन्यात अमेरिकेतील अभ्यासक, इतिहासकार तसेच तज्ज्ञांनी गृहयुद्धाच्या पूर्वीची स्थिती तयार झाल्याचा इशारा बायडेन प्रशासनाला दिला होता. त्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालांमधूनही राजकीय मुद्यांसाठी हातात शस्त्रे घेणाऱ्या अमेरिकी नागरिकांची संख्या वाढत आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या अहवालात ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी लवकरच दुसऱ्या गृहयुद्धाचा भडका उडेल, अशी शक्यता वर्तविली होती. ही बाब अमेरिकेतील राजकीय पक्षाच्या समर्थकांमधील दरी रुंदावत असल्याचे दाखवून देत आहे. नव्या अहवालातूनही याला दुजोरा मिळाला आहे.

राजकीय हिंसाचार‘सीबीएस’ व ‘यु गव्ह’च्या अहवालात ६४ टक्के अमेरिकी नागरिकांनी राजकीय हिंसाचाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्याचे म्हटले आहे. असे मत नोंदविणाऱ्यांमध्ये गेल्या दीड वर्षात तब्बल १३ टक्क्यांची भर पडली. ८० टक्के नागरिकांनी अमेरिका अधिकच विभागली जात असल्याचे म्हटले आहे. तर ५० टक्क्यांहून अधिकांनी भविष्यात अमेरिकेत लोकशाही टिकेल का? यावर शंका व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष म्प व त्यांच्या समर्थकांवर जहरी शब्दात टीका केली होती. म्प यांचे समर्थक कट्टरवादी असल्याचे सांगून ते देशातील लोकशाही धोक्यात आणत असल्याचा ठपका बायडेन यांनी ठेवला होता. त्याला प्रत्युत्तर देताना म्प यांनी बायडेन भ्रमिष्ट झाल्याचा शेरा मारून त्यांची संभावना ‘एनिमी ऑफ द स्टेट’ अशी केली होती.

leave a reply