रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा अमेरिकेसह नाटोला सज्जड इशारा

सज्जड इशारानिःशस्त्रीकरण करून युक्रेनला नाझीवादापासून रोखणे, हे रशियाच्या लष्करी कारवाईचे ध्येय आहे. दुसर्‍या कुठल्याही शक्तीने यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलाच, तर इतिहासाने अनुभवलेले नाही, इतके कठोर प्रत्युत्तर रशियाकडून दिले जाईल – असा सज्जड इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. अमेरिका आणि नाटोचा थेट उल्लेख केा नसला, तरी रशियन राष्ट्राध्यक्षांनी नेमक्या शब्दात आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविल्याचे दिसत आहे.

युक्रेनची राजवट गेल्या आठ वर्षांपासून आपल्याच जनतेचा छळ व वंशसंहार घडवून आणत आहे. त्यापासून युक्रेनी जनतेची सुरक्षा करण्यासाठी रशियाने हे पाऊल उचलले, असा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला. त्याचवेळी रशियाने युक्रेनवर हल्ला चढविलेला नाही, किंवा हे युक्रेनवरील आक्रमणही ठरत नाही, असे पुतिन यांनी म्हटले आहे. तर रशियन राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केलेली उद्दिष्टे पूर्ण झाल्यानंतर रशियाची ही लष्करी मोहीम संपविण्याचा निर्णय होईल, असे रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.

leave a reply