चीनच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढला

- आयातीतील घट व निर्यातीत अपेक्षित वाढ न झाल्यामुळे जगभरात चिंता

बीजिंग – चीनच्या घटलेल्या आयातीमुळे आणि निर्यातीत अपेक्षित वाढ होत नसल्याने जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चीनची अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणाशी घट्टपणे जोडलेली असल्याने चीनमध्ये जे काही घडेल, त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम संभवतात, असे इशारे याआधीच अर्थतज्ज्ञांनी दिले होते. त्याचवेळी चीनची अर्थव्यवस्था आत्ताच्या काळात फार मोठ्या धोक्याचा सामना करीत असल्याचेही अर्थतज्ज्ञांनी बजावले होते. त्यामुळे चीनच्या आयातीत झालेली जवळपास आठ टक्क्यांची घट आणि निर्यातीचा वेग वाढविण्यात चीनला आलेले अपयश नव्या संकटाची सूचना देत असल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक सांगत आहेत.

चीनच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढला - आयातीतील घट व निर्यातीत अपेक्षित वाढ न झाल्यामुळे जगभरात चिंतादोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने चीनच्या आयात व निर्यातीबाबतची माहिती प्रसिद्ध केली होती. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनच्या एप्रिल महिन्यात आयात व निर्यात आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या अपेक्षेनुसार नसल्याचे यात म्हटले होते. मार्चच्या तुलनेत गेल्या महिन्यातील आयात १.४ टक्क्यांनी घट होऊन ७.९ टक्क्यांपर्यंतच झाली आहे. तर निर्यातीत अपेक्षित वाढ नसल्याचे यामध्ये म्हटले होते. मार्च महिन्यात चीनची निर्यात १४.८ टक्के इतकी होती. पण एप्रिल महिन्यात हीच निर्यात ८.५ टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकली.

चीनच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढला - आयातीतील घट व निर्यातीत अपेक्षित वाढ न झाल्यामुळे जगभरात चिंतागेल्या तीन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली बाजारपेठ मर्यादित केल्याचा दावा चीनने केला होता. त्यामुळे इतर देशांप्रमाणे आपल्या देशाच्या आयात-निर्यातीवरही परिणाम झाल्याचे चीनने म्हटले होते. पण गेल्या महिन्यात कोरोनाकाळातील निर्बंध मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा चीनची आयात-निर्यात नवे विक्रम करील. गेल्या वर्षीची आकडेवारी सहज मागे टाकणार असल्याचा दावा चिनी विश्लेषकांनी केला होता. पण तसे घडले नसल्याचे ‘इकॉनॉमिस्ट इंटलिजन्स युनिट’ या गटाचे अर्थतज्ज्ञ शू तियांशेन यांनी म्हटले आहे.

जागतिक अर्थव्यवस्था चीनच्या बाजारपेठेवर तितकासा विश्वास ठेवायला तयार नाही. चीनच्या आयातीतील हा संशय अधिकच दृढ करीत आहे, असे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे. चीनच्या सेमीकंडक्टर्सची बाजारपेठही यामुळे प्रभावित झाली असून यात १५.३ टक्क्यांची घट पहायला मिळाली आहे. चीनसाठी हा मोठा धक्का असल्याचा दावा केला जातो.

हिंदी

 

leave a reply