‘एआय फॉर ऑल’ पोर्टलचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

नवी दिल्ली – गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एआय फॉर ऑल’ या पोर्टलचे उद्घाटन केले. ‘एआय फॉर ऑल’ हा कार्यक्रम तरुणांना भविष्याभिमुख बनवेल. तसेच अर्थव्यवस्था ‘एआय’द्वारे अर्थव्यवस्था अधिक गतिशील करण्याचे मार्ग तयार होतील, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020ला एक वर्ष पुर्ण झाले. यानिमित्ताने ‘एआय फॉर ऑल’ हा पोर्टल सुरू करण्यात आला. तसेच पंतप्रधानांनी देशातील शिक्षक समुदायाला मार्गदर्शन केले.

‘एआय फॉर ऑल’ पोर्टलचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभपुढील वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असणार आहे. नवे शैक्षणिक धोरण अशा टप्प्यावर भविष्यातील भारत घडविण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडेल. आपली भविष्यातील प्रगती आणि विकास, आपण कोणत्या दर्जाचे शिक्षण घेतो आणि आपल्या युवा पिढीला कोणती दिशा देतो, यावरच अवलंबून असणार आहे. राष्ट्रविकासाच्या या महायज्ञात हे नवे शैक्षणिक धोरण महत्वाची समिधा ठरणार आहे, असा मला विश्वास आहे, असे पंतप्रधान यानिमित्ताने म्हणाले.

रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय, स्टार्टअप्स अशी क्षेत्र आणि नव्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करणार्‍या तरुणाईचे त्यांनी कौतुक केले. जर या युवाशक्तीला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य वातावरण आणि अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली तर प्रगतीला सीमा राहणार नाही. यासाठी तरुणांना योग्य संधी उपलब्ध करून द्यायला हवी. यासाठी नवे शैक्षणिक धोरण महत्वाचे ठरेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

गुरुवारी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘एआय फॉर ऑल’ या पार्टलमध्ये ‘एआय’शी निगडीत विविध संधींची माहिती असून विविध कोर्सही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

leave a reply