लॅटिन अमेरिकेतील लष्करी तैनातीवरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची क्युबा, व्हेनेझुएला व निकारागुआशी चर्चा

मॉस्को/हवाना/वॉशिंग्टन – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेनजिकच्या देशांमध्ये लष्करी तैनातीचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी क्युबा, व्हेनेझुएला व निकारागुआ या तिन्ही देशांच्या प्रमुखांशी चर्चा केल्याची माहिती रशियाने दिली. काही दिवसांपूर्वीच रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी, रशिया लॅटिन अमेरिकेतील क्युबा व व्हेनेझुएलामध्ये संरक्षण तैनाती करु शकते, असा इशारा दिला होता. त्यानंतर पुतिन यांनी चर्चा केल्याचे समोर येत आहे.

लॅटिन अमेरिकेतील लष्करी तैनातीवरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची क्युबा, व्हेनेझुएला व निकारागुआशी चर्चारशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी संसदेत लॅटिन अमेरिकेतील संभाव्य तैनातीबाबत माहिती दिली. ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नुकतीच क्युबा, व्हेनेझुएला व निकारागुआच्या नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत लष्करी सहकार्यासह इतर क्षेत्रातील भागीदारी वाढविण्याबाबत बोलणी झाली. तीनही देशांनी रशियाबरोबरील धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यास मान्यता दिली आहे’, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी सांगितले.

लॅटिन अमेरिकेतील लष्करी तैनातीवरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची क्युबा, व्हेनेझुएला व निकारागुआशी चर्चारशियाने यापूर्वी २०१८ व २०१९ मध्ये व्हेनेझुएलात लष्कर तैनात केल्याचे समोर आले होते. व्हेनेझुएलाने राजधानी कॅराकस जवळ असणारा विमानतळ रशियाला हवाईतळ म्हणून वापरण्याची परवानगी दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. रशियन बॉम्बर्स तसेच लढाऊ विमाने व्हेनेझुएलात उतरल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले होते. रशिया व व्हेनेझुएलात संरक्षणतैनातीसंदर्भात करार झाल्याचेही सांगण्यात येते.

क्युबा व रशियादरम्यानही २०१९ साली महत्त्वपूर्ण करार झाले असून, त्यात रशिया संरक्षणतळ सक्रिय करु शकतो, असे संकेत देण्यात आले होते. गेल्या शतकात १९६०च्या दशकात रशियाने क्युबात अण्वस्त्रे तैनात करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. अमेरिकेकडून क्युबावर होणारे संभाव्य आक्रमण टाळण्यासाठी रशियाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. मात्र अमेरिकेने ‘नॅव्हल ब्लॉकेड’चा इशारा दिल्यानंतर तसेच क्युबावर आक्रमण न करण्याचे आश्‍वासन दिल्यावर रशियाने माघार घेतली होती. लॅटिन अमेरिकेतील लष्करी तैनातीवरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची क्युबा, व्हेनेझुएला व निकारागुआशी चर्चाही घटना ‘क्युबन मिसाईल क्रायसिस’ म्हणून ओळखण्यात येते. रशियाने पुन्हा क्युबात लष्करी तैनातीचे संकेत देणे ‘क्युबन मिसाईल क्रायसिस’ची पुनरावृत्ती ठरु शकते, असे दावे विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहेत.

निकारागुआ व अमेरिकेचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणलेले असून या देशाने रशिया तसेच चीनशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच चीनही लॅटिन अमेरिकेतील आपला प्रभाव वाढवित असल्याचा अहवाल समोर आला होता. रशियाने निकारागुआत लष्करी तैनाती केल्यास अमेरिकेची डोकेदुखी अधिकच वाढू शकते.

leave a reply